Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूरात कडक निर्बंध! सावरकर चौक ते हेलीपॅड कॉर्नर ‘सील’-सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत प्रवेशबंदी

0 7 6 4 8 7

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूरात कडक निर्बंध! सावरकर चौक ते हेलीपॅड कॉर्नर ‘सील’-सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत प्रवेशबंदी

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या मतमोजणीदरम्यान कोणताही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सावरकर चौक ते हेलीपॅड कॉर्नर या संपूर्ण मार्गावर प्रवेशबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर येथे सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मात्र, याआधीच सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत संबंधित परिसरात आवश्यक व्यक्तींव्यतिरिक्त सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश बंदी राहणार आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 16 डिसेंबर रोजी शहरात दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे वातावरण तापले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक तुळजापूर यांनी संभाव्य धोके लक्षात घेऊन कडक बंदोबस्ताची मागणी केली होती. त्यानुसार तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी अरविंद बोळंगे यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत हा आदेश निर्गमित केला आहे.प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, मतमोजणीच्या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडू नये, अफवांना थारा मिळू नये आणि शांतता अबाधित राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मतमोजणीच्या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असताना, तुळजापूर शहरात ‘हाय अलर्ट’ जाहीर करण्यात आला असून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे