कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी दर्शनासाठी विशेष निर्णय देणगी दर्शन (₹५०० व ₹१०००) पास बंद,नियमित धर्मदर्शन सुरूच.

तुळजापूर : प्रतिनिधी
शारदीय नवरात्र महोत्सव-2025 (शके 1947) दिनांक 22 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2025 या कालावधीत मोठ्या उत्साहात पार पडत आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेस दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा व इतर राज्यांतून लाखो भाविक तुळजापूरात दाखल होत आहेत.
यंदा 6 व 7 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा असल्याने दरवर्षीप्रमाणेच प्रचंड गर्दी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
या कालावधीत व्ही.आय.पी. संदर्भ दर्शन (₹500) व सशुल्क देणगी दर्शन (₹1000) हे पास बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र, भाविकांना नियमित दर्शनाची सुविधा सुरू राहणार आहे.
त्यानुसार,
⬛ नियमित धर्मदर्शन,
⬛ मुखदर्शन,
⬛ तसेच सशुल्क देणगी दर्शन पास ₹300 हे घाटशीळ पार्किंग मार्गे सुरू राहतील, अशी माहिती तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी दिली.
संस्थान प्रशासनाने सर्व भाविकांना आवाहन केले आहे की, गर्दीच्या पार्श्वभूमीवर शिस्त, स्वच्छता आणि संयम पाळावा व मंदिर प्रशासनास सहकार्य करावे.श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान प्रशासन, तुळजापूर