ब्रेकिंगमहाराष्ट्र
मराठ्यांच्या अस्तित्वाची निर्णायक लढाई; आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची महासभा
मराठ्यांच्या अस्तित्वाची निर्णायक लढाई; आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची महासभा

0
7
6
4
8
6
मराठ्यांच्या अस्तित्वाची निर्णायक लढाई; आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची महासभा
तुळजापूर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आता निर्णायक टप्पा गाठला जात असून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी येथे होणारी बैठक राज्यभरातील मराठा समाजासाठी महत्त्वाची ठरणार आहे. दि. १६ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या या बैठकीस तुळजापूर तालुका व शहरातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सज्जन साळुंके ,आबासाहेब कापसे यांनी केले आहे.मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची पुढील दिशा या बैठकीत ठरणार असून समाजाच्या एकजुटीची ताकद दाखवण्याची ही वेळ असल्याचे सांगण्यात आले. “मराठा समाज आता शांत बसणार नाही; स्वाभिमानासाठी एकत्र येणे काळाची गरज आहे,” अशी तीव्र भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.दरम्यान, आंतरवाली सराटीतील या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून आंदोलनाच्या पुढील भूमिकेबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
0
7
6
4
8
6