Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

प्राण्यांना निर्दय वागणूक — दोन कुरेशी बंधूंवर गुन्हा दाखल!;गोवंशांची बेकायदेशीर वाहतूक करताना येरमाळा पोलिसांची कारवाई

0 7 6 4 8 6

प्राण्यांना निर्दय वागणूक — दोन कुरेशी बंधूंवर गुन्हा दाखल!;गोवंशांची बेकायदेशीर वाहतूक करताना येरमाळा पोलिसांची कारवाई

येरमाळा : प्रतिनिधी

प्राण्यांवर निर्दयतेने वागणूक देत बेकायदेशीरपणे कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या दोन जणांविरोधात येरमाळा पोलिसांनी कारवाई केली आहे. या दोघांविरुद्ध प्राण्यांवर क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आशिफ खलील कुरेशी (वय ४०, रा. पापनास, ता. माढा, जि. सोलापूर) व आदनान खलील कुरेशी (वय २२, रा. समतानगर, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) हे दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री सुमारास वडगाव जळगाव शिवारातील एनएच-५२ महामार्गावर आयशर टेम्पो (क्र. MH-42-GE-9028) मध्ये गोवंशीय जातीच्या १४ जर्सी गायींची (एकूण किंमत अंदाजे ₹१.४० लाख) वाहतूक करत होते.

या गायींना चारा-पाणी न देता, अत्यंत निर्दयतेने व गर्दी करून वाहनात कोंबण्यात आले होते. संशयास्पद हालचाली आढळल्याने येरमाळा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत वाहन ताब्यात घेतले. वाहनासह एकूण मालमत्तेची किंमत सुमारे ₹४.९० लाख इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध प्राण्यांवर क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11(1)(A), 11(1)(D), 11(1)(K), 11(1)(I) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५, ५(अ), ५(ब), व ९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे