Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

डॉक्टर साहेबांनी घातला विकासाचा पाया; राणाजगजितसिंह पाटील पुढे नेत आहेत शाश्वत प्रगतीचा वारसा !

सिंचन, रेल्वे, साखर उद्योग आणि औद्योगिक विकासाची दूरदृष्टी; धाराशिवच्या परिवर्तनामागे डॉ.पद्मसिंह पाटील यांचे योगदान

0 7 6 4 8 6

डॉक्टर साहेबांनी घातला विकासाचा पाया; राणाजगजितसिंह पाटील पुढे नेत आहेत शाश्वत प्रगतीचा वारसा !

सिंचन, रेल्वे, साखर उद्योग आणि औद्योगिक विकासाची दूरदृष्टी; धाराशिवच्या परिवर्तनामागे डॉ.पद्मसिंह पाटील यांचे योगदान

धाराशिव : एकेकाळी दुष्काळ, पाण्याची टंचाई आणि विकासाच्या संधींपासून वंचित राहिलेला धाराशिव जिल्हा आज शाश्वत विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. सिंचन, रेल्वे, साखर उद्योग, शेतीपूरक व्यवसाय आणि औद्योगिक विकासाचा भक्कम पाया रचण्याचे श्रेय ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांना जाते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. धीरज वीर यांनी व्यक्त केले आहे.डॉ. वीर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या लेखात म्हटले आहे की, धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाचे काम वेगाने सुरू असून निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीपासून कृष्णा खोऱ्याच्या पाण्याच्या प्रश्नापर्यंत अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची मुहूर्तमेढ डॉ. पद्मसिंह पाटील यांनीच रोवली होती. आज आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे ही विकासकामे पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहेत.

जिल्ह्यातील साखर उद्योगाच्या वाढीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उसबिलापोटी तब्बल दोन हजार कोटी रुपये मिळाले. १६ साखर कारखाने आणि १२ गूळ पावडर कारखान्यांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे. या विकासामागे सिंचन सुविधांचा विस्तार आणि शेतीला मिळालेले पाणी हे प्रमुख कारण असून त्याचे श्रेय डॉ. पाटील यांच्या दूरदृष्टीला जाते.

कृष्णा खोऱ्याचे पाणी मराठवाड्याला मिळवून देणे, उजनी धरणातील पाणी धाराशिवसाठी आरक्षित करणे, निम्न तेरणा प्रकल्प आणि रेल्वे मार्ग यांसारख्या निर्णयांसाठी डॉ. पाटील यांनी आपली राजकीय कारकीर्द पणाला लावली. जिल्ह्याच्या भविष्यासाठी घेतलेल्या या धाडसी निर्णयांमुळेच आज धाराशिव प्रगतीच्या मार्गावर ताठ मानेने उभा असल्याचे डॉ. वीर यांनी नमूद केले.ते पुढे म्हणाले की, डॉक्टर साहेबांचे संपूर्ण राजकारण सामान्य माणूस, शेतकरी आणि ग्रामीण विकासाभोवती केंद्रित होते. पाटबंधारे आणि ऊर्जा मंत्री म्हणून त्यांनी जिल्ह्यात सिंचन प्रकल्प, वीज उपकेंद्रे आणि पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण केले. त्यामुळे शेतीला पाणी, उद्योगांना ऊर्जा आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.आज कौडगाव एमआयडीसीमध्ये संरक्षण साहित्य उत्पादनाचा प्रकल्प सुरू होण्याच्या मार्गावर आहे. ही जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाची नवी पहाट असून यामागेही दीर्घकालीन नियोजनाचा वाटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करताना डॉ. धीरज वीर यांनी त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त केली. “धाराशिवच्या विकासाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा सिंचन, रेल्वे, उद्योग आणि शेतकरी समृद्धीच्या प्रत्येक पानावर डॉक्टर साहेबांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेले असेल,” असेही त्यांनी म्हटले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे