तुळजापूरनामा न्यूज पोर्टल दिनदर्शिकेचे प्रकाशन तुळजापूर नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष विनोद उर्फ पिटू गंगणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
तुळजापूरनामा न्यूज पोर्टल दिनदर्शिकेचे प्रकाशन तुळजापूर नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष विनोद उर्फ पिटू गंगणे तसेच नूतन सर्व नगरसेवकयांच्या शुभहस्ते करण्यात आले.

तुळजापूरनामा न्यूज पोर्टल दिनदर्शिकेचे प्रकाशन तुळजापूर नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष विनोद उर्फ पिटू गंगणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

तुळजापूर : प्रतिनिधी
दर्पण दिनाचे औचित्य साधून तुळजापूरनामा न्यूज पोर्टलच्या दिनदर्शिकेचा भव्य प्रकाशन सोहळा मंगळवारी दि.६ जानेवारी २०२६ शहरातील नामांकित स्कायलॅड हॉटेल येथे दुपारी ३ च्या दम्यान उत्साहात पार पडला. या दिनदर्शिकेचे प्रकाशन तुळजापूर नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष विनोद उर्फ पिटू गंगणे यांचे निकटवर्तीय विशाल छत्रे तसेच नवविर्वाचित नगरसेवकांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या प्रसंगी तुळजापूर शहरातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्य, निर्भयता आणि समाजहित जपणाऱ्या पत्रकारितेचा सातत्याने पुरस्कार करणाऱ्या तुळजापूरनामा न्यूज पोर्टलच्या कार्याचा उपस्थित मान्यवरांनी यावेळी गौरव केला.
दर्पण दिनानिमित्त पत्रकारितेचे सामाजिक महत्त्व,लोकशाहीतील माध्यमांची जबाबदारी आणि स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्याची भूमिका यावर उपस्थित वक्त्यांनी विचार मांडले. दिनदर्शिकेच्या माध्यमातून वर्षभरातील महत्त्वाचे सामाजिक, सांस्कृतिक तसेच सार्वजनिक उपक्रमांचे सुस्पष्ट चित्रण करण्यात आले असून, यामध्ये आई श्री तुळजाभवानी देवींच्या वर्षभरातील सर्व धार्मिक व पारंपरिक कार्यक्रमांचा सविस्तर समावेश करण्यात आला आहे.कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी नूतन नगराध्यक्ष विनोद उर्फ पिटू गंगणे यांनी तुळजापूरनामा न्यूज पोर्टलला आकर्षक व तेजस्वी शुभेच्छा देत तुळजापूरनामा न्यूज पोर्टलचे संपादक ज्ञानेश्वर गवळी यांचा सन्मान केला.या प्रकाशन सोहळ्यामुळे तुळजापूरनामा न्यूज पोर्टलच्या पत्रकारितेच्या वाटचालीस नवी दिशा आणि अधिक बळ मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




