Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

धाराशिवच्या विकास रणांगणात “अजितदादा” चा आशीर्वाद! नगराध्यक्ष पदासाठी ॲड. मंजुषा साखरे यांची विजयी दमदार एन्ट्री

0 7 6 5 0 6

धाराशिवच्या विकास रणांगणात “अजितदादा” चा आशीर्वाद!

नगराध्यक्ष पदासाठी ॲड. मंजुषा साखरे यांची विजयीची दमदार एन्ट्री

धाराशिव | प्रतिनिधी

धाराशिव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आज अक्षरशः राजकीय वादळ धडकले! राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) पक्षाच्या उमेदवारी अर्जानिमित्त घेतलेल्या ताकद प्रदर्शनाने विरोधकांच्या तंबूत खळबळ उडवत दमदार संदेश दिला – धाराशिवच्या विकासाची धुरा आता राष्ट्रवादीच्या हातातच!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट “धाराशिवचा विकास आमची जबाबदारी” असा स्पष्ट शब्दांत आशीर्वाद दिल्यानंतर या पक्षाच्या उमेदवारीची हवा अधिकच अनुकूल झाली आहे. जिल्हा प्रवक्ते ॲड. विशाल साखरे यांच्या अर्धांगिनी आणि अभ्यासू, सजग नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ॲड. मंजुषा साखरे यांनी सभोवताली जमलेल्या प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने विजयाची चिन्ह दिसत होती.

उमेदवारांचा निघालेला प्रचाराचा ताफा पाहण्यासाठी जनतेची अक्षरशः गर्दी उसळली होती. “अजितदादा पुढे चला, आम्ही तुमच्या सोबत आहोत”, “धाराशिवला नेता हवा, दिशा हवा – ॲड मंजुषाताईंचीच हवा!” अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले होते. पदाधिकारी, महिला वर्ग, तरुण कार्यकर्ते, व्यापारी, हौशी बाहुबली–सर्वच घटक या शक्तीप्रदर्शनात सहभाग घेत असल्याने विरोधकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

धाराशिवच्या विकासास अडथळा आणणाऱ्या राजकारणावर आता जनता पातळीवर तीव्र नाराजी असून, याच नाराजीचे रूपांतर आजच्या गर्दीत पाहायला मिळाले. शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, बाजारपेठेचा विकास, महिला सक्षमीकरण, रोजगारनिर्मिती अशा अनेक प्रश्नांचे निराकरण अजित पवार यांच्या आशीर्वादाने अधिक गतीने होईल, असा विश्वास साखरे समर्थकांनी व्यक्त केला.

राजकीय पंडितांच्या मते, आजचे हे समीकरणे पूर्ण बदलणारे ठरले असून विरोधकांच्या छावणीत गोंधळ माजल्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः युवकांची मोठी उपस्थिती ही या लढतीतील निर्णायक बाजू ठरू शकते.

आता नगराध्यक्ष पदाच्या या चुरशीच्या स्पर्धेत राष्ट्रवादीने दाखवलेली ताकद पाहता एकच चर्चेला उधाण आले आहे—“धाराशिवच्या भविष्यासाठी जनतेचा कौल एका दिशेला झुकताना दिसतो आहे… विरोधकांनी खबरदारी घ्यावी!”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे