Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार;ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपीचा जामीन मंजूर

जिल्हा व सत्र न्यायालय,धाराशिव यांचा निर्णय

0 7 6 4 8 6

बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार;ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपीचा जामीन मंजूर

जिल्हा व सत्र न्यायालय,धाराशिव यांचा निर्णय

तुळजापूर : तामलवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्कार,ॲट्रॉसिटी आणि शस्त्र अधिनियमाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शामसुंदर दयानंद इंगळे (वय ३५, रा. मसला खुर्द,ता. तुळजापूर) याचा नियमित जामीन अर्ज मेहरबान विशेष सत्र न्यायाधीश, धाराशिव यांनी मंजूर केला आहे.

▪️प्रकरणाची पार्श्वभूमी

दि.२७ फेब्रुवारी २०२६ रोजी एका ३२ वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(१), ३५१(२), ३५१(३) सह अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ चे कलम ३(२), ३(v), ३(२)(va) तसेच शस्त्र अधिनियम कलम ३,२५ अन्वये तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा (रजि.नं. २७/२०२६) दाखल करण्यात आला होता.फिर्यादीनुसार, आरोपीने संबंधित महिलेला मसला (खु.) येथून तुळजापूरला सोडण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवले. पुढे शेतातील ज्वारीचे पीक दाखवण्याच्या कारणावरून तिला शेतात नेऊन बंदुकीचा धाक दाखवत बलात्कार केल्याचा आरोप आहे.

▪️बचाव पक्षाचा युक्तिवाद :

सदर प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान बचाव पक्षाच्या वतीने ॲड.एम.बी.माढेकर यांनी प्रभावी युक्तिवाद करत आरोप निराधार असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.आरोपीला खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा दावा करत उपलब्ध पुराव्यांच्या आधारे जामीन मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.

▪️न्यायालयाचा निर्णय

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून व प्रकरणातील परिस्थितीचा विचार करून विशेष सत्र न्यायाधीशांनी बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी शामसुंदर इंगळे याची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.या प्रकरणात बचाव पक्षाच्या वतीने ॲड.धर्मराज अजित सरडे व ॲड. विशाल बारकुल यांनी कामकाज पाहिले. तसेच दिग्विजय वारे व स्वप्निल बोबडे यांनी सहकार्य केले.

3.6/5 - (7 votes)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे