Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

राज्याचे आयटी व सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे श्री तुळजाभवानी देवीला दर्शन;तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांची केली पाहणी

0 7 6 4 8 6

राज्याचे आयटी व सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे श्री तुळजाभवानी देवीला दर्शन;तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांची केली पाहणी

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज श्री क्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातोश्रींचे दर्शन घेतले. देवीच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी महाराष्ट्रास सुख, समृद्धी आणि कल्याण लाभो, अशी प्रार्थना केली.

दर्शनानंतर मंत्री शेलार यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या कामांची गुणवत्ता, गती आणि सुविधा यांचा त्यांनी आढावा घेतला.यावेळी तहसीलदार तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार व व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, सहायक संचालक जया वहाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, पुजारी मंडळ अध्यक्ष विपिन शिंदे, अमरराजे कदम तसेच मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे