नळदुर्गमध्ये भाजपचे शक्ती-प्रदर्शन सभा;‘सबका विश्वास, सबका प्रयास’ हिच आपली ताकद – आमदार राणाजगजितसिंह पाटील
नळदुर्गमध्ये भाजपचे शक्ती-प्रदर्शन सभा;‘सबका विश्वास, सबका प्रयास’ हिच आपली ताकद - आमदार राणाजगजितसिंह पाटील
नळदुर्गमध्ये भाजपचे शक्ती-प्रदर्शन सभा;‘सबका विश्वास, सबका प्रयास’ हिच आपली ताकद – आमदार राणाजगजितसिंह पाटील
नळदुर्ग | प्रतिनिधी
नळदुर्ग नगरपालिकेच्या रणसंग्रामाला उधाण आले असताना, भाजप–शिवसेना युतीच्या प्रचार शुभारंभ सभेला रविवारी संध्याकाळी अभूतपूर्व उत्साह लाभला. संविधान चौकातून ते ऐतिहासिक किल्ला गेटपर्यंत झालेल्या भव्य पदयात्रेत विविध समाजघटकांचा उसळलेला सहभाग पाहून शहरात भाजपची लाट असल्याचे स्पष्ट झाले.

जाहीर सभेत बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला सबका साथ, सबका विकास हा मंत्र आता नळदुर्ग मध्ये सबका विश्वास, सबका प्रयास या रूपाने दिसत आहे. सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे. आजची ही प्रचंड गर्दीच आमची खरी ताकद आहे. नगरपालिका निवडणुकीत शहराचा वेगाने होणारा विकास कायम राहण्यासाठी मतदारांनी भाजपला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, असेही त्यांनी आवाहन केले.

शहरभर भव्य रॅली, उत्स्फूर्त महिला सहभाग
संविधान चौकापासून निघालेल्या रॅलीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार बसवराज धरणे, सर्व २० उमेदवार, पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. महिलांचा मोठा सहभाग रॅलीचे विशेष आकर्षण ठरला. शहरातील प्रमुख चौकांमधून मार्गक्रमण करत रॅली किल्ला गेट येथे विसर्जित झाली. वाटेत मंदिर व दर्गाहात जाऊन उमेदवारांनी दर्शनही घेतले.

दररोज मुबलक पाणीपुरवठा लवकरच
नळदुर्ग शहरातील ४८ कोटींची पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात असून लवकरच नागरिकांना दररोज स्वच्छ, नियमित व मुबलक पाणी मिळणार आहे.रस्ते–गटारांसह शहराच्या मूलभूत सुविधांसाठी १५० कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करण्यात आल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. स्वतंत्र तालुका स्थापनेच्या दिशेने झालेले प्रयत्न, सुरू झालेले अप्पर तहसील कार्यालय आणि नव्याने मंजूर झालेले महावितरणचे उपविभागीय कार्यालय ही मोठी विकासपावले असल्याचे त्यांनी नमूद केले.
सभेत माजी नगरसेवक सचिन डुकरे यांचा भाजप प्रवेश
या सभेत काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन डुकरे यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करून वातावरण आणखी तापवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक अहंकारी यांनी केले.यावेळी नितीन काळे, विनायक अहंकारी, दत्तात्रय दासकर, बसवराज धरणे, रीजवान काझी, ज्ञानेश्वर घोडके, शिवाजी गायकवाड आदींची भाषणे झाली.आमदार राणाजगजितसिंह पाटील, तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनिल चव्हाण, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, जिल्हा सरचिटणीस साहेबराव घुगे, ॲड. दीपक आलुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.



