Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

शिवसेनेचा अनोखा उपक्रम — मतिमंद बालकांसोबत साजरी केली दिवाळी!

राजकारणापेक्षा समाजकारणाला दिले प्राधान्य — तालुकाप्रमुख अमोल जाधव यांचा संवेदनशील उपक्रम

0 7 6 4 9 7

शिवसेनेचा अनोखा उपक्रम — मतिमंद बालकांसोबत साजरी केली दिवाळी!

राजकारणापेक्षा समाजकारणाला दिले प्राधान्य — तालुकाप्रमुख अमोल जाधव यांचा संवेदनशील उपक्रम

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

राजकारणाच्या गोंगाटात समाजसेवेचा सूर जपणारा आणि संवेदनशीलतेचा ठसा उमटवणारा अनोखा उपक्रम तुळजापूरात राबविण्यात आला. शिवसेना तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी यंदाची दिवाळी मतिमंद बालकांसोबत साजरी करत समाजाला मानवतेचा खरा अर्थ दाखवून दिला.

त्यांच्या संकल्पनेतून स्वआधार मतिमंद बालगृह, धाराशिव येथे या विशेष दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी बालगृहातील विद्यार्थ्यांना फटाके, गोडधोड, ब्लॅंकेट्स व विविध भेटवस्तू देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलविण्यात आले. त्या निरागस हास्यातून दिवाळीचा खरा प्रकाश उमटला.

“मतिमंद विद्यार्थी हे आमचे कुटुंब आहे. त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे हे आमचे कर्तव्य आहे,” असे भावनिक उद्गार तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी यावेळी काढले. त्यांच्या या समाजाभिमुख कृतीमुळे उपस्थित मान्यवरांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

 

या कार्यक्रमाला शहर उपप्रमुख रमेश चिवचिवे, संजय लोंढे, विकास जाधव, भुजंग मुकेरकर, स्वप्निल सुरवसे यांच्यासह असंख्य शिवसैनिक, पत्रकार बंधू व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले की —
“राजकारणापेक्षा समाजकारण मोठं आहे, आणि अमोल जाधव यांनी ते कृतीतून सिद्ध केलं आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतो.”

अमोल जाधव यांच्या या ‘समाजाभिमुख दिवाळी उपक्रमा’चे सर्वत्र कौतुक होत असून, तो जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. समाजकारणाला प्राधान्य देणाऱ्या या दिवाळी उपक्रमाने तुळजापूरात खऱ्या अर्थाने माणुसकीचा दिवा प्रज्वलित झाला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे