Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

प्रभाग ५ मध्ये माऊली भोसले यांचा तुफानी उद्रेक भाजपाच्या झेंड्याखाली विजयी लाट; जनतेच्या कौलाने माऊलींचा विजय ‘निश्चित’

प्रभाग ५ मध्ये माऊली भोसले यांचा तुफानी उद्रेक भाजपाच्या झेंड्याखाली विजयी लाट; जनतेच्या कौलाने माऊलींचा विजय ‘निश्चित’

0 7 6 4 8 6

प्रभाग ५ मध्ये माऊली भोसले यांचा तुफानी उद्रेक भाजपाच्या झेंड्याखाली विजयी लाट; जनतेच्या कौलाने माऊलींचा विजय ‘निश्चित’

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर नगर पालिका निवडणूक २०२५चा महाप्रचार आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून प्रभाग क्रमांक ५ मध्ये चंद्रशेखर उर्फे माऊली भोसले यांच्या नावाने प्रचंड उत्साहाची लाट उसळली आहे. भाजपाच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या तुफानी जनजागृती मोहिमेमुळे माऊलींच्या बाजूने जनसमर्थनाचा प्रचंड महापूर ओसंडून वाहताना स्पष्ट दिसत आहे.

“प्रभागात माऊलीचा दरारा!” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमत आहे. नागरिकांचा स्वयंप्रेरणेने मिळणारा प्रतिसाद, महिलांचा उस्फूर्त सहभाग, तरुणांचा जोशपूर्ण उत्साह आणि ज्येष्ठांचा विश्वासाचा आशीर्वाद या सगळ्यामुळे प्रभाग ५ मध्ये भाजपाची भक्कम पकड आणखी मजबूत झाली आहे.

माऊली भोसले यांनी गेल्या काही वर्षांत केलेल्या विकासकामांचा खात्रीशीर हिशेब, रस्ते–पाणी–स्वच्छता–आरोग्य या मूलभूत सुविधांवरील ठोस कामगिरी आणि आगामी सुधारणा आराखड्याची प्रभावी मांडणी याचा थेट फायदा त्यांना मिळताना दिसतो आहे. “कामाचा माणूस, आपला माणूस” अशी त्यांची जिव्हाळ्याची प्रतिमा मतदारांच्या मनात दृढ झाली आहे.

भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी आणि भावी नगराध्यक्ष विनोद उर्फे पिटू गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचाराला अधिक धार प्राप्त झाली असून पुढील काही दिवसांत विशेष संवाद आणि संपर्क मोहीम वेग घेणार आहे. त्यामुळे भाजपाची लाट प्रभागात आणखी प्रचंड होण्याचे संकेत दिसत आहेत.

 

प्रभाग ५ मध्ये ठिकठिकाणी महिलांचा ओढा, युवकांची मोठी उपस्थिती आणि ज्येष्ठांचा प्रामाणिक आशिर्वाद पाहता भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वादळ उठलं आहे. घराघरातील विश्वास, चौकातील चर्चा आणि गल्लीबोळातील जनमत या सर्वच ठिकाणी माऊली भोसले यांचा विजय अटळ आणि अडथळारहित असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

आगामी दिवसांत प्रचाराचा जोर आणखी वाढणार असून तुळजापूर नगर पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ चा निकाल भाजपाच्या बाजूने निर्णायक वळण घेणार, असे संकेत आता सर्वदूर स्पष्टपणे उमटू लागले आहेत.माऊलीच्या विजयी पाऊलखुणा… आता खुल्या डोळ्यांनी दिसत आहेत!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे