ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
तुळजापूर नगरपरिषद निवडणूक ,विकासाचा स्पष्ट रोडमॅप घेऊन मैदानात विनोद ‘पिटू’ गंगणे; तुळजापूरसाठी सर्वसमावेशक जाहीरनामा जाहीर – नागरिकांत उत्सुकता वाढली
सर्वसमावेशक विकास जाहीरनाम्याची घोषणा केली
0
6
7
8
4
1
तुळजापूर नगरपरिषद निवडणूक ,विकासाचा स्पष्ट रोडमॅप घेऊन मैदानात विनोद ‘पिटू’ गंगणे!

तुळजापूरसाठी सर्वसमावेशक जाहीरनामा जाहीर – नागरिकांत उत्सुकता वाढली
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे अधिकृत नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनोद उर्फे पिटु गंगणे यांनी आज आपल्या सर्वसमावेशक विकास जाहीरनाम्याची घोषणा केली. शहराच्या वाढत्या गरजा, धार्मिक पर्यटनाची ओळख आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांचे बळकटीकरण या तीन प्रमुख स्तंभांवर आधारित हा जाहीरनामा असल्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

मंदिर प्रवेशाचा महाद्वार मार्ग सुकर करण्यासाठी समन्वय
महाद्वारातून मंदिर प्रवेशासाठी पुजारी, व्यापारी, प्रसाद विक्रेते व भाविकांच्या सोयीचा समतोल राखून शाश्वत तोडगा काढण्याचा निर्धार गंगणे यांनी व्यक्त केला.

हुतात्मा चौक–किसान चौक कोंडी हटवण्यासाठी मोठा पाऊल
रस्ता रुंदीकरण, ट्रॅफिक सिग्नल प्रणाली व स्वतंत्र पार्किंग यामुळे प्रभाग ४ आणि ७ मधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाला प्राधान्य दररोज घरपट्टीवरून कचरा उचलणे, ओला-सुका कचऱ्याचे वेगळे संकलन आणि वैज्ञानिक प्रक्रिया – शहर स्वच्छ व सुव्यवस्थित ठेवण्यावर भर.एलईडी लाईटिंग व CCTV कॅमेऱ्यांनी सुरक्षित तुळजापूर धार्मिक पर्यटन शहराला योग्य अशी आधुनिक सुरक्षा व्यवस्था उभारण्याचे आश्वासन.

कबाला जमिनीवरील रहिवाशांना न्याय प्रभाग ९ मधील दीर्घकाळ राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्क मिळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेगाने राबवण्याची हमी. ड्रेनेज सुधारणा – तुळजापूरच्या जुन्या समस्येवर उपाय संपूर्ण शहरात आधुनिक भूमिगत ड्रेनेज लाईन उभारण्याचे नियोजन.
उभी पार्किंग सुविधा – वाहतुकीसाठी मोठा दिलासा जिल्हा परिषद शाळा क्र. २ च्या जागेवर अत्याधुनिक उभ्या पार्किंगचे नियोजन.
युवकांना प्राधान्य -तीन मोठे विकास प्रकल्प रोजगाराचे केंद्र
TARA, तुळजापूर विकास आराखडा आणि मंदिर विकास उपक्रमात स्थानिक युवकांना प्रथम संधी. कौशल्य विकास केंद्रे उभारण्याची घोषणा.
RO पाण्याची सुविधा व सार्वजनिक शौचालयांचे जाळे नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी निगडित दोन महत्वपूर्ण पावले.
तरुणांसाठी आधुनिक व्यायामशाळा आरोग्य आणि फिटनेससाठी नगरपरिषद व्यायामशाळा उभारण्याचे आश्वासन.विकासाभिमुख दृष्टीकोन आणि ठोस निश्चयासोबत सादर केलेला जाहीरनामा पाहता तुळजापूरातील मतदारांकडून विनोद उर्फे पिटू गंगणे यांच्या बाजूने सकारात्मक चर्चा सुरू असून वातावरण उत्साहपूर्ण झाले आहे.
मतदान दिनांक : २ डिसेंबर २०२५,वेळ : सकाळी ७ ते संध्याकाळी ६,
तुळजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी हा जाहीरनामा टर्निंग पॉइंट ठरेल, असा विश्वास ‘एकमत’ला शहरात उमटणाऱ्या प्रतिक्रियांतून जाणवतो.
0
6
7
8
4
1



