ब्रेकिंगमहाराष्ट्र
शालेय पोषण आहारातील भ्रष्टाचारावरून सभागृह तापले; आमदार कैलास पाटील यांचा सरकारला जाब
शालेय पोषण आहारातील भ्रष्टाचारावरून सभागृह तापले; आमदार कैलास पाटील यांचा सरकारला जाब

0
6
7
8
4
1
शालेय पोषण आहारातील भ्रष्टाचारावरून सभागृह तापले; आमदार कैलास पाटील यांचा सरकारला जाब
धाराशिव, : शालेय पोषण आहार योजनेतील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विधानसभेत वातावरण तापले असून आमदार कैलास पाटील यांनी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना चांगलेच धारेवर धरले. दोषी अधिकारी व पुरवठादारांवर तात्काळ कारवाई करून प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली. यावर शिक्षणमंत्र्यांनी सचिव पातळीवर चौकशी करून दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन दिले.आमदार पाटील यांनी लक्षवेधीदरम्यान सांगितले की, पंतप्रधान शालेय पोषण आहार योजना राज्यात राबवली जात असताना हिरवा वाटाणा देण्याऐवजी पांढरा वाटाणा वितरित करून मोठा गैरव्यवहार झाला आहे. दोन्ही वाटाण्यांमध्ये सुमारे शंभर रुपये किलोचा फरक असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप त्यांनी केला. अधिकारी व पुरवठादार यांच्या संगनमतातून हा प्रकार घडल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
निविदेत हिरवा वाटाणा नमूद असताना कार्यारंभ आदेशात केवळ ‘वाटाणा’ असा उल्लेख करून वितरित करताना पांढरा वाटाणा देण्यात आला. मात्र, किंमत हिरव्या वाटाण्याची लावून हा प्रकार करण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.या प्रकरणाची दखल घेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी असा प्रकार झाल्याचे मान्य करत चौकशी करून कारवाई करू, असे सांगितले. मात्र, आमदार पाटील यांनी आपण दिलेल्या तक्रारीवर आतापर्यंत काय कारवाई झाली, असा सवाल उपस्थित करत पुरवठादारांना पाठीशी घालण्याचा आरोप केला. त्यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.परिस्थिती पाहता शिक्षणमंत्र्यांनी भूमिका नरम करत प्रथम आयुक्तांमार्फत व नंतर सचिवांमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन दिले. या मुद्द्यावरून आमदार कैलास पाटील यांनी सरकारला कोंडीत पकडत चौकशीस भाग पाडले.
0
6
7
8
4
1



