Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

मंगरुळ जिल्हा परिषद गटात सायकलचा वेग वाढला; भाजपच्या अंतर्गत वादाचा फटका थेट मतदारांवर

मंगरुळ जिल्हा परिषद गटात सायकलचा वेग वाढला; भाजपच्या अंतर्गत वादाचा फटका थेट मतदारांवर

0 7 6 4 8 6

मंगरुळ जिल्हा परिषद गटात सायकलचा वेग वाढला; भाजपच्या अंतर्गत वादाचा फटका थेट मतदारांवर

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा मंगरुळ जिल्हा परिषद गट सध्या प्रचंड राजकीय नाट्याचा साक्षीदार ठरत आहे. भाजपमधील अंतर्गत वाद, नाराजी आणि गटबाजीमुळे हा गट आता भाजपच्या हातातून निसटत चालल्याचे स्पष्ट चित्र समोर येत असून, याचा थेट फायदा सायकल चिन्हाला होताना दिसत आहे. भाजपप्रणीत गटाने या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती. मात्र ऐनवेळी भाजपने अपेक्षित उमेदवाराला डावलत दुसऱ्याच चेहऱ्याला तिकीट दिल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप उसळला.आमचा विश्वासघात झाला अशी भावना उघडपणे व्यक्त होत असून,भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.या नाराजीचा परिणाम थेट मतदानावर होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. भाजपच्या इच्छुकांनी अपक्ष अर्ज मागे घेतले असले तरी त्यांच्या समर्थकांनी आता उघडपणे सायकल चालवण्याचा निर्धार केल्याची चर्चा गावोगावी सुरू आहे.दादा म्हणतायेत सायकल चालवा, अण्णा गुपचूप साथ देतो हे समीकरण मंगरुळ गटात जोर धरू लागले आहे.भाजपच्या गटबाजीमुळे मतदार संभ्रमात सापडले असताना, सायकलीने मात्र संघटनात्मक ताकद, शिस्तबद्ध प्रचार आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या जोरावर आघाडी घेतली आहे. गावपातळीवर सायकलच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत असून, भाजपच्या नाराज गटाकडूनही अप्रत्यक्ष मदत होत असल्याने सायकलचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे.एकीकडे भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप, नाराजी आणि कुरघोडीचे राजकारण सुरू असताना, दुसरीकडे राष्ट्रवादीने शांत पण आक्रमक रणनीतीने मतदारांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. त्यामुळे मंगरुळ गटात आता एकच चर्चा आहे. की या निवडणुकीत खरा सामना भाजप विरूद्ध सायकल असा लागणार असुन सायकलच विजयी ठरणार अशी चर्चा आहे व मंगरुळचा हायहोल्टेज ड्रामा आता निर्णायक वळणावर पोहोचला असून,भाजपच्या अंतर्गत भांडणाचा फटका त्यांनाच बसणार,अशी चिन्हे ठळकपणे दिसत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे