ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
युवा पिढीला व्यसनमुक्तीचा संदेश ; बावी आश्रमशाळा–महाविद्यालयात पोलिसांचे मार्गदर्शन

0
6
7
8
4
1
युवा पिढीला व्यसनमुक्तीचा संदेश ; बावी आश्रमशाळा–महाविद्यालयात पोलिसांचे मार्गदर्शन
तुळजापूर | प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील बावी येथील आश्रमशाळा, विद्यालय व महाविद्यालयात छत्रपती संभाजीनगर अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स युनिट, धाराशिव यांच्या वतीने व्यसनमुक्ती विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात युवा पिढीने व्यसनांपासून दूर राहून जीवनात प्रगती कशी साधावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गांजा, ड्रग्स व इतर अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक नुकसान याविषयी माहिती देण्यात आली.हा कार्यक्रम नार्कोटिक ड्रग्स विभागाच्या आय.जी. श्रीमती शारदा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी नागपूरचे पोलीस अधीक्षक अजित टिके, पुण्याचे पोलीस अधीक्षक खाटमोडे, छत्रपती संभाजीनगरचे सहायक पोलीस निरीक्षक विजय जगदाळे व दीपाली पाटील मॅडम यांच्या सूचनांनुसार कार्यक्रम राबविण्यात आला.धाराशिव युनिटचे सहायक पोलीस उपनिरीक्षक वाहेद मुल्ला, गोपाळ पुरके, महिला हवालदार शैला टेळे, नागेश केंद्रे, निलेश सरफाळे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत व्यसनांच्या दुष्परिणामांची जाणीव करून दिली.या कार्यक्रमाला बावी महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक वर्ग तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प व्यक्त करत कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

0
6
7
8
4
1



