Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

शिवराज्याभिषेक सोहळा साजरा न करणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई करा – किसन पाटील

शिवराज्याभिषेक सोहळा साजरा न करणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई करा - किसन पाटील

0 7 6 4 8 6

शिवराज्याभिषेक सोहळा साजरा न करणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई करा – किसन पाटील

छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन (शिवस्वराज्य दिन) ६ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये साजरा करणे बंधनकारक असतानाही, जे लोकप्रतिनिधी किंवा ग्रामसेवक हा सोहळा साजरा करणार नाहीत, त्यांच्यावर तात्काळ कडक प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष किसन पाटील यांनी केली आहे. हा सोहळा टाळणाऱ्या किंवा शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ग्रामपंचायतींविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आला आहे.महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने १ जानेवारी २०२१ रोजी जारी केलेल्या अधिकृत शासन निर्णय (क्रमांक: संकीर्ण-२०२०/प्र.क्र.८५/पंराज-४ – संकेतांक क्रमांक: २०२१०१०११७२०२४९१२०) नुसार खालील नियम स्पष्ट करण्यात आले आहेत हा निर्णय कोणत्याही एका वर्षापुरता मर्यादित नसून, दरवर्षी ६ जून रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ साजरा करणे कायदेशीररीत्या बंधनकारक आहे या दिवशी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर अधिकृतरीत्या जरीची किनार असलेला शुद्ध भगवा ध्वज लावून स्वराज्यगुढी उभारणे अनिवार्य आहे.गुढी उभारल्यानंतर सर्व अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताचे गायन करणे बंधनकारक आहे. या कार्यक्रमाच्या खर्चासाठी ग्रामपंचायतींना स्वतःच्या उत्पन्नातून किंवा १५ व्या वित्त आयोगाच्या प्रशासकीय निधीतून खर्च करण्याची अधिकृत परवानगी देण्यात आली आहे.कारवाई न केल्यास “शासकीय निधी आणि स्पष्ट आदेश उपलब्ध असतानाही जर एखादी ग्रामपंचायत शिवस्वराज्य दिन साजरा करत नसेल, तर तो थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि शासकीय आदेशाचा अवमान आहे,” असे किसन पाटील यांनी म्हटले आहे. अशा दोषी ग्रामपंचायतींचे सरपंच आणि ग्रामसेवकांवर तात्काळ प्रशासकीय कारवाई करून त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात यावा. प्रशासनाने यावर तात्काळ पावले उचलली नाहीत, तर ‘जागर प्रतिष्ठान’च्या वतीने राज्यभरात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कार्यालयांसमोर तीव्र निदर्शने आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा किसन पाटील यांनी दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे