Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत पीडितांना न्याय व आधार देणे हीच प्रशासनाची प्राथमिकता

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार ॲट्रॉसिटी प्रकरणातील वारसांना शासकीय नियुक्ती आदेश

0 7 6 4 8 6

ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत पीडितांना न्याय व आधार देणे हीच प्रशासनाची प्राथमिकता

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार ॲट्रॉसिटी प्रकरणातील वारसांना शासकीय नियुक्ती आदेश

आंतरराष्ट्रीय नेमबाज चेतन सपकाळचा गौरव

धाराशिव : अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गाच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा (ॲट्रॉसिटी कायदा) अत्यंत महत्त्वपूर्ण असून जातीय अन्याय निर्मूलनाच्या दिशेने टाकलेले हे प्रभावी पाऊल आहे.दर महिन्याला जिल्हा दक्षता समितीच्या नियमित बैठका घेऊन बाधितांना आर्थिक व न्यायालयीन मदत करण्यात येते. त्यामुळे या कायद्यांतर्गत अत्याचार पीडितांना तातडीने मदतीसाठी आपण प्रयत्नशील आहोत,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले. दि.३१ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय धाराशिव यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ॲट्रॉसिटी प्रकरणांतील मृतांच्या कुटुंबीयांना शासकीय/निमशासकीय सेवेत नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले. याच कार्यक्रमात धाराशिवचा आंतरराष्ट्रीय दिव्यांग नेमबाज चेतन सपकाळ याचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी पुजार होते.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, राजाभाऊ ओहोळ, विद्यानंद बनसोडे,महादेव वाघमारे व समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुजार पुढे म्हणाले की,चेतन सपकाळ हा जिल्ह्याचा अभिमान असून त्याने आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवून जिल्ह्याचा मान उंचावला आहे.अनेक खेळाडूंना तो प्रेरणादायी ठरत असून त्याच्या आदर्शातून इतरांनीही प्रगतीची दिशा घ्यावी.तसेच ॲट्रॉसिटी कायद्याबाबत जनजागृती सुरू असून नियुक्ती आदेश मिळालेल्या वारसांनी शासकीय सेवेत प्रामाणिकपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

श्रीमती.प्रियंवदा महाडदळकर म्हणाल्या की,अशा उपक्रमांमुळे सामाजिक विकासाला गती मिळत आहे.अत्याचार पीडितांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घेणे ही महत्त्वाची बाब आहे.चेतन सपकाळच्या यशामागे त्याच्या आईचे योगदान मोठे असून त्या खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहेत.कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते चेतन सपकाळ याचा त्याच्या आई – वडिलांसह भारतीय संविधान उद्देशिकेची प्रत,प्रशस्तीपत्र व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे