Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

तुळजापूर गोळीबार प्रकरण : गणेश रोचकरींसह सहा जणांना जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन

तुळजापूर गोळीबार प्रकरण : गणेश रोचकरींसह सहा जणांना जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन

0 6 7 8 4 1

तुळजापूर गोळीबार प्रकरण : गणेश रोचकरींसह सहा जणांना जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन

धाराशिव : तुळजापूर येथील बहुचर्चित गोळीबार प्रकरणात अटकेत असलेल्या गणेश देवानंद रोचकरी यांच्यासह अन्य सहा जणांना जिल्हा व सत्र न्यायालय, धाराशिव यांनी दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड.एम.बी.माढेकर यांनी प्रभावी युक्तिवाद मांडला न्यायालयाने तो ग्राह्य धरून निर्णय दिला. या प्रकरणात ॲड.धर्मराज सरडे व ॲड.विशाल बारकुल यांनीही काम पाहिले.या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानादिवशी तुळजापूर येथील हॉटेल सारंग येथे जुन्या वादातून दोन गटांत वाद झाला. या वादाचे पर्यवसान गोळीबारात झाले असल्याचे ज्यामध्ये अष्टविनायक जाधव हे गंभीरजणी झाले असल्याची फिर्याद तुळजापूर पोलीस ठाण्यात मध्ये दिली याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) शस्त्र अधिनिय मातील विविध कलमान्वये (गुन्हा क्र. ६२/२०२६) गुन्हा नोंद करण्यात आला होता.गुन्हा नोंद झाल्याच्या नंतर तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष देवानंद साहेबराव रोचकरी यांनी पत्रकार परिषद घेऊन सदर गुन्हा हा राजकीय दोशातून नोंद झाला असल्याचे स्पष्ट केले.न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे या प्रकरणात गणेश देवानंद रोचकरी ,रोहित विक्रम पवार ,अक्षय सज्जन गायकवाड, अतिश पोपट भांगे, अक्षय बंडू शिरसागर ,मल्हारी कुंदन क्षीरसागर आणि खंडू विश्वनाथ कांबळे यांनी जामीनासाठी अर्ज केला होता.दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी या अर्जावर जिल्हा व सत्र न्यायालय धाराशिव येथे सुनावणी पार पडली यावेळी बचाव पक्षाचे वकील ॲड,एम.बी.माडेकर यांनी मा. न्यायालयासमोर महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे आणि युक्तिवाद मांडले दोन्ही बाजूंचा व्यक्तिवात ऐकल्यानंतर न्यायालयाने ॲड माडेकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरला आणि सर्व सातही आरोपींची जामीनवर मुक्तता करण्याचे आदेश दिले.या निकालामुळे आरोपीला मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे.

4.8/5 - (5 votes)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे