स्मशानभूमी वादाची ठिणगी,पण आरोपींना मिळाला कायदेशीर दिलासा !
ॲड.विशाल साखरे यांच्या युक्तिवादाला यश; आठ आरोपींना मिळाला अटकपूर्व जामीन
स्मशानभूमी वादाची ठिणगी,पण आरोपींना मिळाला कायदेशीर दिलासा !
ॲड.विशाल साखरे यांच्या युक्तिवादाला यश; आठ आरोपींना मिळाला अटकपूर्व जामीन
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
मोहा (ता. कळंब) गावातील पारधी समाज व गावातील रहिवाशांमध्ये झालेल्या स्मशानभूमी वादातून दाखल झालेल्या ॲट्रॉसिटी प्रकरणातील आठ आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालय, कळंब यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
कळंब पोलीस ठाण्यात गु.र.क्र. 308/2025 कलम U/Sec 118(1),115(2),351(2),352,18(2),191(2),190,326(g) ऑफ BNS तसेच ॲट्रॉसिटी कायदा कलम 3(1)(r)(s)(va) अंतर्गत हा गुन्हा ६ जून २०२५ रोजी नोंदविण्यात आला होता.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, स्मशानभूमीतील दफनविधी संदर्भात पारधी समाज आणि गावातील नागरिकांमध्ये वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.या वादात पोलीस प्रशासनावर दगडफेक झाल्याची नोंद करण्यात आली होती.
या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी जिल्हा व सत्र न्यायालय, कळंब येथे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सुनावणीदरम्यान ॲड. साखरे यांनी सविस्तर युक्तिवाद मांडत सांगितले की,
◾“सदर वाद हा केवळ स्मशानभूमीवरील अतिक्रमणासंदर्भात होता. मोहा गावातील नागरिकांनी कोणतेही गैरकृत्य केलेले नाही. उलटपक्षी, फिर्यादी व त्यांच्या समाजातील लोकांनीच पोलीसांवर दगडफेक केली असून त्याचे व्हिडिओ पुरावे उपलब्ध आहेत.”
तसेच तक्रार देण्यास विलंब झाल्याने फिर्यादीने विचारपूर्वक खोटा गुन्हा दाखल केल्याचे नमूद करत, सदर प्रकरण हे द्वेषातून नोंदवले गेले असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.
न्यायालयाने सादर केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी दयानंद मडके, रोहित मडके, महेंद्र मडके, नवनाथ मडके, राहुल मडके, मयुर मडके, विजय मडके व अजित मडके या आठ जणांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या प्रकरणात ॲड. साखरे यांना ॲड. मंजुषा साखरे,ॲड . अमित गोळे,ॲड.महेश लोहार,ॲड. शुभम तांबे,ॲड. अर्चना कांबळे,ॲड .लक्ष्मीकांत कुलकर्णी,ॲड.उदय आडेकर,ॲड.संकेत गोरे,ॲड. ओंकार कोरेगावकर, महेश पवार, पृथ्वीराज खोचरे आणि रोहित लोमटे यांनी सहकार्य केले.



