Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीस जन्मठेप – पोलिस तपास व सरकार पक्षाची ठोस कामगिरी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीस जन्मठेप – पोलिस तपास व सरकार पक्षाची ठोस कामगिरी

0 7 6 4 9 7

अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीस जन्मठेप – पोलिस तपास व सरकार पक्षाची ठोस कामगिरी

धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने आजीवन सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा सुनावली असून, पोलिस तपास यंत्रणा व सरकार पक्षाच्या प्रभावी कामगिरीमुळे पीडितेस न्याय मिळाला आहे.
येडशी (ता. धाराशिव) येथील धर्मराज मारुती कचरे (वय ५०) याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी करून दोषारोपपत्र सादर केले.
मा. न्यायालयाने आरोपीस भा.दं.सं. 376(AB) तसेच पोक्सो कायद्यान्वये आजीवन सश्रम कारावास सुनावला.

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपी दोषी ; १० वर्षे सश्रम कारावास

धाराशिव : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने कडक शिक्षा सुनावली असून, पोलिसांच्या काटेकोर तपासामुळे गुन्हा सिद्ध झाला आहे.सांजा (ता. धाराशिव) येथील हाकीम महेमुद काझी (वय २८) याच्याविरोधात आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तपास पोउनि एस.जी. भुजबळ यांनी केला.मा. न्यायालयाने आरोपीस विविध कलमान्वये एकूण १० वर्षे सश्रम कारावास व २१ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

७० वर्षीय नराधमास जन्मठेप ; पोक्सोअंतर्गत ऐतिहासिक शिक्षा

बेंबळी : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ७० वर्षीय आरोपीस न्यायालयाने आजीवन सश्रम कारावास सुनावून कठोर संदेश दिला आहे. कामेगाव (ता. लोहारा) येथील गोरोबा पांडुरंग वाघमारे (वय ७०)याच्याविरोधात दाखल गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक डी.व्ही. मैंदाड (पिंक पथक) यांनी केला.मा. न्यायालयाने आरोपीस पोक्सो कायद्यांतर्गत आजीवन कारावास व दंड सुनावला.

तरुणीवर अत्याचार प्रकरण ; आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास

तुळजापूर : प्रतिनिधी

तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस मा. न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास व दंड ठोठावला असून, पोलिस तपासाची दखल घेत कडक निकाल देण्यात आला आहे.टाकळी (ता. धाराशिव) येथील सुरज बाबू लातुरे (वय ३६) याच्याविरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. तपास पोउनि एस.जी. बनसोडे यांनी केला.न्यायालयाने विविध कलमान्वये शिक्षा सुनावली.

खून प्रकरणात आरोपी दोषी ; १० वर्षे कारावास व ४५ हजारांचा दंड !

बेंबळी : प्रतिनिधी

महिलेला जिवे ठार मारणाऱ्या आरोपीस न्यायालयाने कडक शिक्षा सुनावली असून, प्रशासनाच्या प्रभावी कार्यवाहीमुळे न्याय मिळाला आहे.सांगवी (ता. धाराशिव) येथील विष्णु लक्ष्मण लोंढे (वय ३१) याने मोहिनी चोपडे यांचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. तपास पोउनि एस.एल. जमदाडे यांनी केला.मा. न्यायालयाने आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास व ४५ हजार रुपये दंड सुनावला.प्रशासनाची ठोस भूमिका ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.सरकारी वकील एस.एस. सूर्यवंशी व एस.बी. देशमुख यांनी प्रभावी युक्तिवाद करून आरोपींना शिक्षा मिळवून दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे