Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजाभवानी मंदिर संस्थानला अनुभवी प्रशासकाची साथ उपेंद्र तामोरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे हाती घेतली; तीर्थक्षेत्र विकासाला मिळणार नवी गती

तुळजाभवानी मंदिर संस्थानला अनुभवी प्रशासकाची साथ उपेंद्र तामोरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे हाती घेतली; तीर्थक्षेत्र विकासाला मिळणार नवी गती

0 7 6 4 8 6

तुळजाभवानी मंदिर संस्थानला अनुभवी प्रशासकाची साथ उपेंद्र तामोरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे हाती घेतली; तीर्थक्षेत्र विकासाला मिळणार नवी गती

तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे अपर जिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी उपेंद्र गोविंद तामोरे यांनी दि. २ जून २०२६ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीमुळे तुळजाभवानी मातेच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला नवी दिशा आणि गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.सन २००२ बॅचचे उपजिल्हाधिकारी असलेले उपेंद्र तामोरे यांना महसूल, नियोजन आणि प्रशासन क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. मंदिर संस्थानमध्ये नियुक्तीपूर्वी ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), अंधेरी, मुंबई येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.राज्य शासनाने मंजूर केलेल्या तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत विविध विकासकामे प्रस्तावित असून, त्यांचे प्रभावी नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आता तामोरे यांच्या खांद्यावर असणार आहे. प्रशासकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्य करताना पारदर्शक प्रशासन, विकासाभिमुख नियोजन आणि लोकाभिमुख कामकाजाचा ठसा उमटविला आहे.तुळजाभवानी मंदिर संस्थानचे प्रशासन अधिक सक्षम करणे, भाविकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे, मंदिर परिसरातील विकासकामांना गती देणे आणि तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास साधणे यासाठी त्यांच्या अनुभवाचा मोठा लाभ होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

▪️तीर्थक्षेत्र विकासासाठी अनुभवी नेतृत्व तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनाने आखलेल्या महत्त्वाकांक्षी आराखड्याच्या अंमलबजावणीच्या टप्प्यावर उपेंद्र तामोरे यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात असून, भाविक सुविधांसह विकासकामांना वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे