Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

पंतप्रधानांच्या पत्नी जशोदाबेन मोदी व बंधू अशोक मोदी यांचे तुळजाभवानी मातेचे दर्शन तुळजापूरात साधेपणा व भक्तीभावाचे दर्शन

0 7 6 4 8 6

पंतप्रधानांच्या पत्नी जशोदाबेन मोदी व बंधू अशोक मोदी यांचे तुळजाभवानी मातेचे दर्शन
तुळजापूरात साधेपणा व भक्तीभावाचे दर्शन

तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी सौ.जशोदाबेन मोदी आणि पंतप्रधान यांचे बंधू अशोक मोदी यांनी मंगळवारी सकाळी श्रीक्षेत्र तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.अतिशय साध्या वेशभूषेत आणि भक्तिमय वातावरणात त्यांनी आई तुळजाभवानीची विधीवत पूजा व आरती केली.

कोणताही विशेष थाट न ठेवता त्यांनी सामान्य भाविकांप्रमाणे दर्शन घेतल्याने उपस्थित भाविकांमध्ये कौतुकाची चर्चा होती.मंदिरात आगमन झाल्यानंतर पुजारी सचिन वसंत अमृतराव कदम यांनी त्यांचे स्वागत केले. पारंपरिक विधींनुसार पूजा पार पडली. यावेळी सौ.जशोदाबेन मोदी यांनी अखंड हिंदुस्तानची जगतजननी आई तुळजाभवानीसमोर पुष्प अर्पण करत देशाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.या दौऱ्यात साधेपणा, शिस्त आणि श्रद्धेचे दर्शन घडले. पंतप्रधान कुटुंबीयांचा हा भक्तिमय क्षण भाविकांसाठी विशेष ठरला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे