Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांचा काक्रंबा गटातील दौरा पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी; पडझड झालेल्या घरांची,पिके व प्रलंबित कामांचा आढावा

“जनतेच्या अडचणी सोडवणं हीच खरी सेवा”-ओमप्रकाशराजेंचा काक्रंबा गटात जनसंपर्क दौरा

0 6 7 8 4 1

“जनतेच्या अडचणी सोडवणं हीच खरी सेवा”- ओमप्रकाशराजेंचा काक्रंबा गटात जनसंपर्क दौरा

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या भागात दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा जिल्हा परिषद गटातील काक्रंबा, होणाला, मेसाई, जवळगा, सलगरा आणि कीलज या गावांचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची व घरांची पडझडीची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच, एम.एस.सी.बी.च्या प्रलंबित कामांचा आढावा घेत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी गावातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष भेटी घेऊन नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचे काम हाती घेतले. त्यांनी शासन योजनांच्या अंमलबजावणीतील उशीर का ? या विषयीही अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

या दौऱ्यात शिवसेनेचे आक्रमक युवा नेतृत्व ऋषिकेश मगर, गोपाल सुरवसे, ॲड. रामचंद्र ढवळे, शाम पवार, संजय गंजुटे, गौरीशंकर कौवडगिरे, माजी पंचायत समिती सदस्य खंडा शिंदे, जिल्हा परिषद सदस्य बालाजी बंडगर, माजी सरपंच नाना मुळे, दादा चौधरी, बाबा इंगळे, शाम माळी, उमेश खांडेकर, चेतन बंडगर आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या दौऱ्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, स्थानिक पातळीवरील समस्यांच्या निराकरणास गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

1/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे