Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

रणनीती पैशाची की मतदारांची? तुळजापूरच्या तरुण मतदारांकडून सत्तेला आव्हान!

तुळजापूरमध्ये पैशाचे राजकारण की मतदारांचा जागर?

0 7 6 4 9 7

रणनीती पैशाची की मतदारांची? तुळजापूरच्या तरुण मतदारांकडून सत्तेला आव्हान!

तुळजापूरमध्ये पैशाचे राजकारण की मतदारांचा जागर?

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर नगर परिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय समीकरणांना वेग आला आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा या जुन्या रणनितीसमोर यंदाच्या निवडणुकीत तरुण नवमतदार निर्णायक ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे.

शहरातील १४,५३८ पुरुष आणि १५,०१७ महिला असे एकूण २९,५५५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शहरात मूलभूत नागरी सुविधा अपुऱ्या असून, नागरिक प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल प्रचंड नाराज आहेत.

नगर परिषदेकडून स्वच्छता, पथदिवे, रस्ते, सार्वजनिक पाणपोई, स्वच्छतागृहे, खेळाची मैदाने अशा आवश्यक सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. उपविभागीय अधिकारी तथा प्रभारी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या निष्क्रियतेमुळे विकासकामे थांबली आहेत.

शहरात अवैध व्यवसाय, जुगार, व्यसनाधीनता, मोटारसायकल चोरी, पोलीस प्रशासनाचे अपयश, तसेच मोकाट जनावरे आणि बेशिस्त पार्किंग यांसारख्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे, तर तरुण मतदार बदलाच्या दिशेने विचार करत आहेत.

श्रीक्षेत्र तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखड्यासाठी मंजूर १८६५ कोटींचा निधी, तसेच शहर विकास प्राधिकरण आणि यात्रा अनुदानातून येणारा कोट्यवधी निधी नेमका कुठे जातो, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. स्थानिक पुजारी, व्यापारी आणि नागरी वर्ग यांना विश्वासात न घेता तयार झालेल्या विकास आराखड्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

अनेक वर्षांपासून हुतात्मा स्मारक ते आर्य चौक रस्ता, पावणारा गणपती मंदिर रस्ता रुंदीकरण, तसेच लघुशंकालयांची कमतरता, अतिक्रमण विभागाची व्यापाऱ्यांवरील आर्थिक लूट, भाजी विक्रेत्यांवरील त्रास या तक्रारी कायम आहेत.

नुकतेच घोषित झालेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक आरक्षणात महिलांना मिळालेल्या संधीचे स्वागत असले, तरी “महिला निवडून आल्या तरी कारभार पतीच चालवणार” असा सूर जनतेतून उमटतो आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी असो वा महायुती, दोन्ही आघाड्यांसाठी ही निवडणूक सोपी नसणार आहे. कारण यंदा तरुण मतदारांचा मूड ठरवणार आहे – पैसा जिंकणार की परिवर्तन!

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे