Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

प्रभाग ५ मध्ये “राकेश राजेश चोपदार” लाट; बदलाची चाहूल ठाम — तरुणाईचा नवा आवाज घरोघर पोहोचला! चोपदार घरानेशाहीचा राजकारणाशी कसलाही गंध नाही; तरुण नेतृत्व, धडपड आणि आई जगदंबेचा आशीर्वाद यांवर मतदारांचा विश्वास

चोपदार घरानेशाहीचा राजकारणाशी कसलाही गंध नाही; तरुण नेतृत्व, धडपड आणि आई जगदंबेचा आशीर्वाद यांवर मतदारांचा विश्वास

0 6 7 8 4 1

प्रभाग ५ मध्ये “राकेश राजेश चोपदार” लाट; बदलाची चाहूल ठाम — तरुणाईचा नवा आवाज घरोघर पोहोचला!

चोपदार घरानेशाहीचा राजकारणाशी कसलाही गंध नाही; तरुण नेतृत्व, धडपड आणि आई जगदंबेचा आशीर्वाद यांवर मतदारांचा विश्वास

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्र. ५ मध्ये वाऱ्याची दिशा स्पष्ट दिसू लागली असून, या निवडणुकीत तरुण नेतृत्व म्हणून राकेश राजेश चोपदार हे नाव जोरदार चर्चेत आहे. चोपदार घराण्यावर घरानेशाहीचा लेप नाही; उलट जनतेसाठी धावणारे कार्यकर्ते म्हणून या कुटुंबाची ओळख आहे.

चुलते तुळजाभवानी मातेचे सेवेकरी अमर चोपदार यांचे मार्गदर्शन, वडिलांचा पाठीवरचा आधार आणि आई जगदंबेचा अष्टभुज आशीर्वाद घेऊन राकेश चोपदार प्रभागात दमदार जनसंपर्क करत आहेत.

दैनंदिन प्रश्नांवर तत्काळ प्रतिसाद, तरुणाईशी असलेला दृढ संवाद आणि नागरिकांच्या घरी जाऊन विचारपूस करण्याची त्यांची कष्टाळू शैली—यामुळे मतदारांच्या मनात “या वेळी बदल तर राकेश चोपदारच!” असा ठाम सूर ऐकू येत आहे.

प्रभाग ५ मधील नागरिकांचं एकमत “चोपदार सरळ, नितळ आणि काम करणारा नेता; या वेळी विकासासाठी नव्या चेहऱ्यावरच विश्वास!”

सोशल मीडियापासून गल्लीबोळातील चर्चा, चौकातील राजकीय गप्पा ते घराघरातील संवाद—सर्वत्र राकेश चोपदार हे नावच प्रमुख ठरत असून त्यांची जनसंपर्काची लाट दिवसेंदिवस वाढत आहे.

मतदान पेटी उघडली की अंतिम निकाल मिळेल, पण सध्या प्रभाग ५ मध्ये चोपदारांची मजबूत आघाडी, अष्टभुज मातेचा आशीर्वाद आणि बदलाची जाहीर इच्छा ठळकपणे जाणवत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे