तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले! आरक्षण सोडती जाहीर; राजकीय वर्तुळात हालचालींना वेग…
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले! आरक्षण सोडती जाहीर; राजकीय वर्तुळात हालचालींना वेग...
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले! आरक्षण सोडती जाहीर; राजकीय वर्तुळात हालचालींना वेग…
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर दि.८ ऑक्टोंबर रोजी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून, या सोडतीमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. इच्छुक उमेदवार आणि पक्षांच्या गटात उत्सुकतेचे वातावरण असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे.
नगरपरिषदेच्या एकूण ११ प्रभागांसाठी अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. या सोडतीमुळे अनेक दिग्गज नेत्यांना पुनश्च संधी मिळाली असून, काहींना सुरक्षित प्रभागाच्या शोधात निघावे लागणार आहे.
◾प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.
▪️प्रभाग १ (तुळजापूर खुर्द):
सर्वसाधारण महिला
▪️प्रभाग २ (हाडको, विश्वानगर, आयोध्यानगर): अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला
▪️प्रभाग ३ (जिजामाता नगर): ना.मा.प्र. (महिला), सर्वसाधारण
▪️प्रभाग ४ (मंकावती,आर्य चौक,साळुंके गल्ली): ना.मा.प्र., सर्वसाधारण महिला
▪️प्रभाग ५ (खडकाळ गल्ली, अण्णाभाऊ साठे नगर): अनु.जाती (महिला), सर्वसाधारण
▪️प्रभाग ६ (आराधवाडी, भिमनगर): अनु.जाती, . सर्वसाधारण महिला
▪️प्रभाग ७ (जवाहर गल्ली, कमान वेस, पंढरपूर गल्ली): ना.मा.प्र. (महिला), सर्वसाधारण
▪️प्रभाग ८ (वेताळ नगर, कुंभार गल्ली,चर्मकार गल्ली): अनु.जाती (महिला), सर्वसाधारण
▪️प्रभाग ९ (घाटशिळ, दिपक चौक, वडार गल्ली): ना.मा.प्र., सर्वसाधारण महिला
▪️प्रभाग १० (नळदुर्ग रोड, पूर्व मंगळवार पेठ): ना.मा.प्र., सर्वसाधारण महिला
▪️प्रभाग ११: ना.मा.प्र. (महिला), सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण
या आरक्षण सोडतीनंतर नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, शहरात उमेदवार चाचपणी आणि मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. प्रभागांची फेररचना झाल्याने काही विद्यमान नगरसेवकांना इतर प्रभागातून आपले राजकीय भविष्य आजमावे लागणार आहे, तर नवीन आणि तरुण चेहऱ्यांना संधीची दारे खुली झाली आहेत.
एकूणच, या आरक्षण सोडतीमुळे तुळजापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असून, निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.



