Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

ढोकीत ‘महापोलिस मित्र संघ’ शाखा क्रमांक 3 चे भव्य उद्घाटन धनुवेद वेल्फर फाउंडेशनच्या उपक्रमाला मान्यवरांची उपस्थिती

0 6 7 8 4 1

ढोकीत ‘महापोलिस मित्र संघ’ शाखा क्रमांक 3 चे भव्य उद्घाटन धनुवेद वेल्फर फाउंडेशनच्या उपक्रमाला मान्यवरांची उपस्थिती

ढोकी : प्रतिनिधी

धनुवेद वेल्फर फाउंडेशन संचालित महापोलीस मित्र संघ, महाराष्ट्र राज्य शाखा क्रमांक 3 चे ढोकी येथे उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. सामाजिक बांधिलकी, जनसहभाग आणि कायदा-सुव्यवस्थेतील जनजागृती यासाठी ही शाखा मोलाची भूमिका बजावणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा सौ. अनिताताई लष्करे, संस्थापक व उपाध्यक्ष लक्ष्मण पवार सर, ढोकी ग्रामपंचायतीचे सरपंच अश्विनीताई माळी व उपसरपंच अमोल पापा समुद्रे, मा. पं.सा. सदस्य संग्राम भैया देशमुख, पोलिस पाटील राहुल वाकुरे, ढोकी पोलीस ठाण्याचे अधिकारी कांबळे मॅडम व तोटक सर, डॉ. रसाळे सर, दौलत भैया गाढवे, तसेच धाराशिव जिल्ह्यातील पोलीस मित्र संघाच्या सदस्या सुषमा शिंदे, श्रीदेवी अंकुशकर व बबिता जानराव आदी मान्यवर उपस्थित होते.

ढोकी शाखेचे पदाधिकारी म्हणून —
अध्यक्ष : अश्विनी गोविंद डांगे
उपाध्यक्ष : पूजा अच्युत डोलारे
सचिव : पल्लवी परीट
सदस्या : स्वाती वाघमारे, रेश्मा वस्ताद, आशा बनकर, मंगल लोंढे, नंदाबाई खंदारे, शारदा बॉम्बे, शितल सोनवणे, मीनाक्षी शरणात, उमा आदमाने, स्नेहल कदम, मनीषा ससाने
सहकारी सदस्य : रोहित लगड

कार्यक्रमाचे सुबक सूत्रसंचालन प्रताप ढवारे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन पूजा डोलारे यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अश्विनीताई डांगे यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले.

कार्यक्रमात सरपंच व उपसरपंचांनी नव्या शाखेस हार्दिक शुभेच्छा देत गावातील कायदा-सुव्यवस्था, नागरिकांचे भान, सामाजिक उपक्रम आणि पोलिस जनसहभाग वाढविण्यास ही शाखा निश्चितच हातभार लावेल, असा विश्वास व्यक्त केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे