Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तामलवाडीत एअरटेल टॉवरवरील महागडी प्लेट चोरी प्रकरणी यूपीतील आरोपी जेरबंद; तामलवाडी पोलिसांची धडक कारवाई

तामलवाडीत एअरटेल टॉवरवरील महागडी प्लेट चोरी प्रकरणी यूपीतील आरोपी जेरबंद; तामलवाडी पोलिसांची धडक कारवाई

0 7 6 5 0 8

तामलवाडीत एअरटेल टॉवरवरील महागडी प्लेट चोरी प्रकरणी यूपीतील आरोपी जेरबंद; तामलवाडी पोलिसांची धडक कारवाई

तुळजापूर : तामलवाडी येथील एअरटेल कंपनीच्या मोबाईल टॉवरवरील नेटवर्कसाठी वापरण्यात येणाऱ्या सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीच्या डीएलए/एसएफ प्लेट चोरी प्रकरणी तामलवाडी पोलिसांनी उत्तर प्रदेशातील एका आरोपीला तांत्रिक तपासाच्या आधारे अटक केली आहे. या आरोपीने मराठवाड्यातील पाच ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.तामलवाडी येथील एअरटेल मोबाईल टॉवरवरील डीएलए/एसएफ प्लेटची चोरी ७ जानेवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी केली होती. या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन व साहित्य जप्त करण्यात आले. पुढील चौकशीत ध्रुव त्रिभुवन प्रसाद (वय २५, रा. भागदिवा, ता. बारा, जि. प्रयागराज, उत्तर प्रदेश) व त्याचा साथीदार हे खोटे आधार कार्ड व लायसन्स वापरून मोठ्या शहरांतून भाड्याने गाड्या घेऊन दिवसभर मोबाईल टॉवरची रेकी करीत आणि रात्री महागड्या प्लेटची चोरी करत असल्याचे उघड झाले.गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पुन्हा महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती मिळताच तामलवाडी पोलिसांनी सापळा रचला. वैराग–गौडगाव मार्गे बेबळी पोलीस ठाणे हद्दीतील देवळाली शिवारात आरोपीला रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली.ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोकर, अपर पोलीस अधीक्षक शफाकत अमना व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर, पीएसआय प्रदीप टेकाळे, हवालदार संजय कलमदाने, सुरज नरवडे, नितीन भोसले व पोलीस मित्र अमोल पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडली. या कारवाईमुळे टॉवर चोरीच्या घटनांना आळा बसणार असल्याचे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे