Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यास पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा गतीदायक पाठपुरावा !

५५५.८० कोटींच्या कामांना तांत्रिक मान्यता; तुळजापूरच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा .

0 7 6 4 8 6

श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यास पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा गतीदायक पाठपुरावा !

५५५.८० कोटींच्या कामांना तांत्रिक मान्यता; तुळजापूरच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा .

धाराशिव, : प्रतिनिधी

श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रस्तावित भव्य विकास आराखड्यास शासनस्तरावर निर्णायक वेग मिळाला असून, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सातत्यपूर्ण व प्रभावी पाठपुराव्यामुळे या आराखड्यातील प्रमुख कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. या अंतर्गत सुमारे ५५५.८० कोटी रुपयांच्या कामांना हिरवा कंदील मिळाल्याने तुळजापूरच्या विकासाच्या दृष्टीने हा टप्पा ऐतिहासिक ठरणार आहे.या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रगतीसाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे संबंधित सर्व यंत्रणांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत कामांना गती देण्याबाबत स्पष्ट व ठोस निर्देश देण्यात आले.या बैठकीला आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार, मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना हे ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाले होते, तर अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कळवकर, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.

▪️१८६५ कोटींच्या विकास आराखड्याला शासनाची मान्यत

श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यास शासनाने एकूण १८६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, यातील पहिल्या टप्प्यातील चार प्रमुख कामांसाठी ५५५.८० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे.

▪️घाटशीळ पार्किंग येथे भाविक सुविधा केंद्र व बहुउद्देशीय वाहनतळ – ७७.०२ कोटी
▪️हडको पार्किंग परिसरात सुविधा केंद्र, व्यावसायिक संकुल, बहुउद्देशीय सभागृह व वाहनतळ – ३७६.३३ कोटी
▪️आराधवाडी पार्किंग येथे सुविधा केंद्र – ४५.४३ कोटी
▪️जुने एस.टी. स्टँड परिसरात भाविक सुविधा केंद्र – ५७.२३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

याशिवाय आराखड्यातील ४५७.८० कोटी रुपयांच्या कामांना तांत्रिक मान्यता देण्यात आली असून निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. सन २०२५-२६ साठी ५४.२८ कोटी तर सन २०२६-२७ साठी अंदाजे ५०० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. भूमी संपादनासाठी यापूर्वीच २८.८८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

भाविक सुविधा, पर्यटन व रोजगाराला चालना – सरनाईक

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी हा प्रकल्प केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक, सांस्कृतिक व पर्यटन विकासाचा आदर्श नमुना ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

“अनुभवी कंत्राटदारांकडून गुणवत्तापूर्ण कामे वेळेत पूर्ण करून घ्यावीत. योग्य अंदाजपत्रक सादर झाले तर निधी वितरणात कोणतीही अडचण येणार नाही. सर्व कामे जानेवारी २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवावे,” अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

मंदिर परिसरातील महसूली जमीन मंदिर संस्थानच्या ताब्यात देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देत, मंदिर परिसरात स्वतंत्र पोलीस चौकीसाठी तरतूद केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सर्व यंत्रणांनी एकत्रित पाहणी करून स्वतंत्र अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.तुळजापूरच्या विकासाला ऐतिहासिक चालना या प्रकल्पामुळे भाविकांच्या सुविधांमध्ये आमूलाग्र सुधारणा होणार असून, तुळजापूर शहराच्या पर्यटन, रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा प्रत्यक्षात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे