Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

शिक्षण सभापतींची न. प. शाळेला अचानक भेट; विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक

शिक्षण सभापतींची न. प. शाळेला अचानक भेट; विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक

0 7 6 4 8 7

तुळजापूर : येथील नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ ला नगरपरिषद शालेय शिक्षण सभापती तथा नगरसेवीका सौ. नीता दिनेश क्षिरसागर यांनी अचानक सदिच्छा भेट देत शाळेची पाहणी केली. यावेळी त्यांनी इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासून पाहिली. विविध प्रश्न विचारून विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता जाणून घेतली असता विद्यार्थ्यांचा प्रतिसाद समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले.शाळेतील शैक्षणिक कामकाज, उपक्रम, तसेच शिक्षकांचे नियोजन याची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना अधिकाधिक स्पर्धात्मक बनवण्यासाठी विविध स्पर्धांसाठी पारितोषिके जाहीर करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.या प्रसंगी लोहारे केरण यांनी सौ. नीता क्षिरसागर यांचा सत्कार केला. यावेळी युवा नेते दिनेश क्षिरसागर, मुख्याध्यापक गणेश रोचकरी, सहशिक्षक महेंद्र पाटील, बाळासाहेब जेटीथोर, महेंद्र कावरे, सुज्ञानी गिराम, विद्यादेवी स्वामी आदी उपस्थित होते. शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी असे उपक्रम प्रेरणादायी ठरत असल्याची भावना यावेळी दिनेश क्षिरसागर यांनी व्यक्त करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे