ब्रेकिंगमहाराष्ट्र
नळदुर्ग पोलिसांची मोठी कारवाई; १०.३८ कोटींचे हशीम ऑईल जप्त
नळदुर्ग पोलिसांची मोठी कारवाई; १०.३८ कोटींचे हशीम ऑईल जप्त

0
7
6
5
0
6
नळदुर्ग पोलिसांची मोठी कारवाई; १०.३८ कोटींचे हशीम ऑईल जप्त
तुळजापूर : नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या पथकाने दि.१९ मार्च रोजी नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान मोठी कारवाई करत तब्बल १०,३८,२०,००० रुपये किंमतीचे हशीम ऑईल सदृश्य अंमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक सोळुंके व पोलीस उपनिरीक्षक गिते हे आपल्या पथकासह उपजिल्हा रुग्णालय नळदुर्ग ते तुळजापूर मार्गावर नाकाबंदी करत असताना एमएच १२ जीव्ही १५१७ क्रमांकाची संशयास्पद कार दिसून आली. पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिला असता वाहन चालकाने पळ काढला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग सुरू केला.दरम्यान, कारमधील एका इसमाने रस्त्याच्या कडेला एक बॅग फेकून दिली. संशयित बॅगची पाहणी केली असता त्यामध्ये दहा प्लास्टिक पिशव्यांमध्ये हिरवट-काळपट रंगाचे हशीम ऑईल सदृश्य अंमली पदार्थ आढळून आले. या पदार्थाचे एकूण वजन १०.३८२ किलो असून त्याची बाजार किंमत १०,३८,२०,००० रुपये इतकी आहे.सदर प्रकरणी गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कलम ८(सी), २०( बी)(ii)( सी),२५,२९ अन्वये गुन्हा क्रमांक ११४/२०२६ नोंद करण्यात आला आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांच्या नेतृत्वात नळदुर्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी मेघना आय एन,सहाय्यक पोलीस निरीक्षक सोळुंके, आनंद कांगुने,पोलीस उपनिरीक्षक गिते व पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
0
7
6
5
0
6



