ब्रेकिंगमहाराष्ट्र
गावगुंडांना लगाम; खंडणीप्रकरणी दोघे जेरबंद, पोलिसांची धडक कारवाई
गावगुंडांना लगाम; खंडणीप्रकरणी दोघे जेरबंद, पोलिसांची धडक कारवाई

0
7
6
4
8
7
गावगुंडांना लगाम; खंडणीप्रकरणी दोघे जेरबंद, पोलिसांची धडक कारवाई
तुळजापूर, तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ – इटकळ रोड परिसरातील दत्त मंदिराच्या जवळ पवनचक्की प्रकल्पाच्या कामादरम्यान कामगाराला मारहाण करून खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात पोलिसांनी जलद कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. गावगुंडांना आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.या प्रकरणात गणेश सरडे व भाऊसाहेब सरडे (रा. सरडेवाडी) यांना मंगरूळ बीट अंमलदार महादेव राऊत,केदार वाघुलकर या पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. १ एप्रिल रोजी दुपारी मंगरूळ-इटकळ रोडवरील दत्त मंदिराजवळ पवनचक्कीचे पाते वाहतूक करणाऱ्या वाहनाला अडवून एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती.फिर्यादी रामेश्वर तानवडे यांना आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व बेल्टने मारहाण केली होती. तसेच त्यांच्या खिशातील ५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप आहे.पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे यांनी ठोस कारवाई करत आरोपींना जेरबंद केले. घटनेनंतर तानवडे यांनी ११२ वर कॉल केल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोन्ही आरोपींना अटक केली.या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून गावगुंडांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे हे करीत आहेत.
0
7
6
4
8
7



