ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
विनोद पिटू गंगणे यांच्या विरोधात प्रचाराचा राग; कुलदीप मगर यांच्यावर थरारक प्राणघातक हल्ला;दोन आरोपी ताब्यात,उर्वरितांचा शोध युद्धपातळीवर..

0
7
6
4
8
6
विनोद पिटू गंगणे यांच्या विरोधात प्रचाराचा राग; कुलदीप मगर यांच्यावर थरारक प्राणघातक हल्ला !

दोन आरोपी ताब्यात,उर्वरितांचा शोध युद्धपातळीवर..
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूरातील स्थानिक राजकारण चांगलेच तापले असून, त्यातूनच एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. विनोद पिटू गंगणे यांच्या विरोधात प्रचार केल्याचा राग मनात धरून कुलदीप मगर यांच्यावर धारदार शस्त्रांसह बंदुकीचा वापर करत प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. नळदुर्ग रोड परिसरात घडलेल्या या घटनेत पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे कुलदीप मगर यांचे प्राण वाचल्याची चर्चा आहे.

या गंभीर प्रकरणात पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, उर्वरित आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख आणि पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. तपास पथकात संतोष करवार, अमोल पवार, पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

जखमी कुलदीप मगर यांनी दिलेल्या जबाबानुसार, सात ते आठ जणांनी संगनमताने धारदार शस्त्रांनी तसेच बंदुकीचा वापर करून हल्ला केल्याचा गंभीर आरोप केला आहे. निवडणुकीत विरोधात प्रचार केल्याचा सूड उगवण्यासाठीच हा हल्ला केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान,लोहिया मंगल कार्यालय, विठाई हॉस्पिटल परिसरातून रिव्हॉल्व्हरची पुंगळी जप्त करण्यात आली असून, घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने तपास केला आहे. प्राथमिक तपासात हल्ल्यात बंदूक व रिव्हॉल्व्हरचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले आहे. स्वतः पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे आणि पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे यांनी सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करून इतर आरोपींची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि स्थानिक पोलीस मोठ्या संख्येने परिसरात तैनात करण्यात आले आहेत. स्पॉट पंचनामा पूर्ण झाला असून आरोपींचे मोबाईल फोन स्विच ऑफ असल्याने तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. उर्वरित आरोपींना लवकरच अटक केली जाईल आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी दिला आहे.या घटनेमुळे तुळजापूरातील राजकीय वातावरण अधिकच चिघळण्याची शक्यता असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.
0
7
6
4
8
6



