ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
आ.राणाजगजितसिंह पाटील यांचा सुप्रिया सुळे यांच्यावर झंझावाती प्रहार! “तुळजापूरची बदनामी थांबवा; वस्तुस्थिती जाणून घ्या!”
0
7
6
4
8
7
आ.राणाजगजितसिंह पाटील यांचा सुप्रिया सुळे यांच्यावर झंझावाती प्रहार!

“तुळजापूरची बदनामी थांबवा; वस्तुस्थिती जाणून घ्या!”
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्यांवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आज अक्षरशः शेल्फोडणी केली. अजितदादा आणि सुनेत्राआत्या जशा माझ्या नातेवाइक, तसंच आपणही माझी थोरली बहीण आहात. पण चुकीची माहिती घेऊन माझ्यावर सलग टीका करणं आपणास शोभून दिसत नाही,असा हल्लाबोल पाटील यांनी केला.
ड्रग्ज प्रकरणावरून राजकीय ‘मीडिया ट्रायल’?
तुळजापूरातील ड्रग्ज प्रकरणावरून सुळे यांनी दोनदा केलेल्या विधानांवर पाटील भडकले.तुळजाभवानीच्या पवित्र क्षेत्राची बदनामी करण्याच्या षडयंत्राला, नकळत का होईना, आपणच हातभार लावत आहात! तथ्य तपासूनच बोलायला हवं होतं. नाहीतर हे राजकीय ‘मीडिया ट्रायल’चं सूचक उदाहरण ठरतं,”असा रोखठोक टोला त्यांनी लगावला.
“जे सहकार्य करत होते, त्यांनाच आरोपी केले!”आपल्या वक्तव्यात राणाजगजितसिंह पाटील पुढे म्हणाले -“तुळजापूरातील महिलांनी निवडणुकीच्या काळात हा गंभीर प्रकार माझ्या निदर्शनास आणून दिला. मी स्वतः पोलिसांना माहिती दिली, स्थानिक गुन्हे शाखेला सहकार्य करण्यासाठी विनोद गांगणे यांना जोडले. पण दुर्दैवाने पोलिसांनी सहकार्य करणाऱ्यांनाच आरोपी केलं! न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर करताना हे स्पष्ट नमूदही केलं आहे.
संतोष परमेश्वरांच्या प्रवेशावरूनही सुळे यांना टोला
संतोष परमेश्वर माझ्या उपस्थितीत भाजपात आले, पण त्याआधीपर्यंत ते राष्ट्रवादीचेच प्रमुख नेते होते. ड्रग्ज प्रकरणानंतरही तुम्ही त्यांना पक्षातून काढले नव्हते. कारण दोष सिद्ध होईपर्यंत कोणीही गुन्हेगार नसतो- हे संविधान सांगतं. मग आज हा दुटप्पीपणा का? असा सवाल त्यांनी उभा केला.शताब्दी रुग्णालयाच्या निविदेत तिरंगी राजकारण नाही, तर पारदर्शकता! मुंबईतील शताब्दी रुग्णालयाच्या निविदेबाबतही त्यांनी सुळे यांना दमदार प्रत्युत्तर दिलं-तेरणा ट्रस्टने केवळ निविदेत सहभाग घेतला. याआधी तीनदा निविदा निघाली, तरी कोणी आले नाही. मग यात चूक कुठे? ती आपण सांगितली तर बरं होईल!” चर्चेला मी तयार, पुराव्यांसह सगळं दाखवीन आपल्यावरील शंका दूर करण्यासाठी आपण तयार असल्याचे सांगत पाटील म्हणाले“वस्तुनिष्ठ माहिती, कागदपत्रांसह थेट चर्चा करू. पण तुळजापूरचा अपमान निश्चितच सहन करणार नाही”

0
7
6
4
8
7



