Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

अंगाशी आलं की पळ काढणं ही राणा पाटील यांची जुनी सवय – शिवसेना प्रवक्ते तानाजी जाधवर यांचा भाजपला चिमटा

0 7 6 4 9 7

अंगाशी आलं की पळ काढणं ही राणा पाटील यांची जुनी सवय – शिवसेना प्रवक्ते तानाजी जाधवर यांचा भाजपला चिमटा !

धाराशिव, : प्रतिनिधी

एखादं प्रकरण आपल्या अंगाशी येणार हे लक्षात येताच राणा पाटील त्या विषयाला बगल देऊन पळ काढतात, असा थेट आरोप शिवसेना (उबाटा) पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी केला आहे. भाजपने जर खरोखरच पारदर्शकतेचा आग्रह धरत असेल, तर त्यांनीच या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी करावी, जेणेकरून कोणाचे हितसंबंध यात गुंतले आहेत हे समोर येईल, असे आव्हान त्यांनी भाजपला दिले.

 

जाधवर म्हणाले की,भाजपच्या प्रवक्त्याद्वारे राणा पाटील जे बोलले ते सत्य शोधायला त्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या यंत्रणेला फार अवघड नाही. कारण सत्ता तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत तुमचीच आहे. मग चौकशीपासून पळ का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.राणा पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या कामांनाही पूर्वी आर्थिक हितसंबंध साधण्यासाठी स्थगिती आणली होती, असा आरोप करत जाधवर म्हणाले की, “आर्थिक लाभ होत नसला की राणा पाटील विकासकामांमध्ये खोडा घालतात. त्यामुळे विकास कोणाचा करायचा आहे, हे आता जनतेलाही समजलं आहे.”पुढे बोलताना ते म्हणाले की,कोणता गुत्तेदार कोणाचा लाडका आहे, हे वीस महिने प्रक्रिया प्रलंबित ठेवूनच सिद्ध झालं आहे. विषय भरकवटण्यासाठी राणा पाटील जाणीवपूर्वक विषयांतर करत आहेत. पण आता सत्य जनतेसमोर आलंच आहे.जाधवर यांच्या या वक्तव्यामुळे धाराशिवच्या राजकारणात पुन्हा एकदा चांगलीच खळबळ उडाली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे