Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

महामंडळांचा आधार घेऊन तरुणांनी उद्योजक बनावे – अभिजीत लांडे यांचे आवाहन

महामंडळांचा आधार घेऊन तरुणांनी उद्योजक बनावे – अभिजीत लांडे यांचे आवाहन

0 7 6 4 8 6

महामंडळांचा आधार घेऊन तरुणांनी उद्योजक बनावे – अभिजीत लांडे यांचे आवाहन

भूम (प्रतिनिधी)

“स्पर्धात्मक युगात केवळ नोकरीच्या मागे धावू नका, तर शासनाच्या विविध महामंडळांच्या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करा,” असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी अभिजीत लांडे यांनी केले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मंत्री आ. राणा जगजितसिंह पाटील, माजी आ. सुजितसिंह ठाकूर व जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भूम पंचायत समिती सभागृहात एकदिवसीय “व्यवसाय-उद्योग विषयक मेळावा” आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा उद्योग आघाडी तालुका अध्यक्ष बापू बगाडे यांच्या पुढाकाराने घेण्यात आला.

या प्रसंगी विविध महामंडळांचे अधिकारी उपस्थित होते. यामध्ये मौलाना आझाद महामंडळाचे फैसल काझी, दिव्यांग महामंडळाचे युवराज घोडके, महात्मा फुले इतर मागासवर्ग महामंडळाचे आर्यन राठोड, वसंतराव नाईक महामंडळाचे अनामिक सरवदे, इतर मागासवर्ग महामंडळाचे मधुकर शिनगारे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे धनंजय कसबे, संत रोहिदास व चर्मकार महामंडळाचे डी.एच. टकले, तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे अर्जुन बारंगुळे आदींचा समावेश होता.

मेळाव्यात भाजपचे ज्येष्ठ नेते आदम शेख, तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर, शहराध्यक्ष बाबासाहेब वीर, माजी नगरसेवक रोहन जाधव, किरण औटे, प्रेरणादायी उद्योजिका चित्रा शिंदे, शेख आयूब आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शंकर खामकर यांनी केले.लांडे म्हणाले की, “महामंडळे ही केवळ मदत संस्थाच नाहीत, तर नवतरुणांसाठी उभारी देणारे आधारस्तंभ आहेत. शासनाच्या योजनांची माहिती घेतल्यास आणि त्यांचा योग्य वापर केल्यास प्रत्येक तरुण उद्योजक बनू शकतो.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे