Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

धुळे–सोलापूर महामार्गावर रस्ता सुरक्षेला चालना येडशी टोलनाक्यावर वाहन चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर

धुळे–सोलापूर महामार्गावर रस्ता सुरक्षेला चालना

0 6 7 8 4 1

धुळे–सोलापूर महामार्गावर रस्ता सुरक्षेला चालना

येडशी टोलनाक्यावर वाहन चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर

धाराशिव | ज्ञानेश्वर गवळी

रस्ता सुरक्षा अभियान २०२६ च्या पार्श्वभूमीवर धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग (एनएच-५२) वरील येडशी टोलनाक्यावर वाहन चालकांसाठी एक उपयुक्त व समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र पोलीस केंद्र धाराशिव आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


या उपक्रमाचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी महाराष्ट्र पोलीस केंद्र धाराशिवचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने वाहन चालकांची दृष्टीक्षमतेची तपासणी अत्यंत महत्त्वाची असल्याने, त्यांच्या पुढाकारातून हे शिबिर आयोजित करण्यात आले.रोटरी नेत्र रुग्णालय, धाराशिव यांच्या सहकार्याने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या विविध वाहन चालकांची नेत्र तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान ज्या चालकांना चष्म्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले, अशा चालकांना नोंदीनुसार मोफत चष्मे वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.या यशस्वी उपक्रमासाठी महाराष्ट्र पोलीस केंद्र धाराशिव येथील सर्व अंमलदार, येडशी टोलनाका कर्मचारी तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक नारायण डप्पडवाड, मोटार वाहन निरीक्षक सुशांत धुमाळे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सिद्धेश्वर मस्के, कार्यालय अधीक्षक नरसिंह कुलकर्णी उपस्थित होते. रोटरी नेत्र रुग्णालयाचे डॉ. इसाके व त्यांच्या वैद्यकीय पथकाने तपासणीची जबाबदारी समर्थपणे पार पाडली.या उपक्रमामुळे वाहन चालकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता वाढली असून, भविष्यातील अपघात टाळण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधिक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे