ब्रेकिंगमहाराष्ट्र
घरपोच लोकसेवाच ध्येय -आयुक्त किरण जाधव जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक; ई-गव्हर्नन्समध्ये तिसऱ्या क्रमांकाबद्दल प्रशासनाचे अभिनंदन
घरपोच लोकसेवाच ध्येय - आयुक्त किरण जाधव जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक; ई-गव्हर्नन्समध्ये तिसऱ्या क्रमांकाबद्दल प्रशासनाचे अभिनंदन

0
7
6
5
1
0
धाराशिव, दि. १७ : सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या सेवा वेळेत आणि घरपोच पद्धतीने मिळाव्यात, हाच लोकसेवा हक्क आयोगाचा प्रमुख उद्देश असल्याचे प्रतिपादन लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त किरण जाधव यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.आयुक्त जाधव यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध सेवांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) स्वाती शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत १५० दिवसांच्या कार्यालयीन मूल्यमापनात जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव यांना राज्यात तिसरा क्रमांक मिळाल्याबद्दल आयुक्तांनी जिल्हाधिकारी व सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच नागरिकांना तत्पर सेवा दिल्याबद्दल कळंब व परंडा तहसील कार्यालय तसेच वाशी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.लोकसेवा हक्क अधिनियमानुसार जाहीर सेवांची पूर्तता विहित कालमर्यादेत करणे बंधनकारक असून, विलंब झाल्यास जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही आयुक्त जाधव यांनी दिला. सेवा अर्जांची वेळेत नोंद, निर्धारित मुदतीत निकाली काढणे, अपील प्रक्रिया आणि पारदर्शक माहिती देण्याबाबत काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.जिल्हा प्रशासनाने विकसित केलेल्या व्हॉट्सॲप चॅटबोट व “तुळजाई” तक्रार नोंदणी ॲपच्या माध्यमातून नागरिकांना सुलभ सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल आयुक्तांनी विशेष कौतुक केले.जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी या डिजिटल उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. बैठकीला विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
0
7
6
5
1
0



