लोकशाहीची लूट!ओंकार देशमुखांचा पूर्वलिखित निर्णय न्यायालयाने टराटरा फाडून काढला !;देशमुखांच्या मनमानीला न्यायालयाने लगावला चाप! आदेश रद्द..
देशमुखांच्या मनमानीला न्यायालयाने लगावला चाप! आदेश रद्द..

लोकशाहीची लूट!ओंकार देशमुखांचा पूर्वलिखित निर्णय न्यायालयाने टराटरा फाडून काढला!

देशमुखांच्या मनमानीला न्यायालयाने लगावला चाप! आदेश रद्द..
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांचा वादग्रस्त निर्णय आता चक्क जिल्हा न्यायालयानेच रद्द केल्याने खळबळ उडाली आहे. सुनावणी होण्यापूर्वीच निकाल तयार केला, अशा गंभीर आरोपांसह हा प्रकार उघड केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) जिल्हा प्रवक्ते ॲड,विशाल प्रभाकर साखरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सुनावणी १९ ला… निकाल १८, लाच?; अजब कारभार उघड
प्रकरण असे की,प्रभाग क्र. 2 (अ) मधील उमेदवार सोनाली स्वप्निल माने यांच्या नामनिर्देशनावर आक्षेप दाखल झाले होते. या संदर्भातील सुनावणी १९ नोव्हेंबर २०२५ रोजी ठेवण्यात आली होती. मात्र, सुनावणी होण्याआधीच, म्हणजे १८ नोव्हेंबरलाच, निर्णय अधिकाऱ्यांनी नामनिर्देशन अवैध ठरवत आदेश जारी केल्याचा आरोप साखरे यांनी केला.
“ही उमेदवाराची फसवणूक!” ॲड,विशाल साखरे म्हणाले,
सुनावणीपूर्वीच निकाल तयार ठेवणे हा निवडणूक प्रक्रियेचा उघड अपमान आहे. उमेदवाराची सरळ फसवणूक केली गेली. लोकशाहीला काळिमा फासणारा हा प्रकार आहे.या आदेशाविरोधात दाखल अर्जावर जिल्हा मा.न्यायाधीश आर.के.खोमणे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने निर्णय अधिकाऱ्यांचा आदेश रद्द ठरवित उमेदवारास दिलासा दिला.
निवडणूक प्रक्रियेवरील प्रश्नचिन्हे तीव्र या घटनाक्रमामुळे धाराशिव नगरपरिषद निवडणुकीवर अनेक शंकांची सावली पडत आहे. निर्णय अधिकाऱ्यांनी सुनावणी न घेता, गुपचूप आदेश काढून उमेदवाराला बाद करणे-हा प्रकार प्रशासनातील पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उभे करतो.
ॲड,साखरे यांनी शासनाकडे मागणी केली की अशा प्रकारे नियमांचं उल्लंघन करून उमेदवारांना न्याय नाकारणाऱ्या निर्णय अधिकाऱ्यावर तत्काळ कठोर कारवाई करावी. अन्यथा निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास ढासळेल.
स्थगितीमुळे प्रभागात अनिश्चिततेचे सावट
या वादानंतर प्रभाग क्रमांक २ (अ) मधील निवडणूक प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली असून,मतदारांमध्ये गोंधळ आणि संताप निर्माण झाला होता.
या प्रभागाची निवडणूक २० डिसेंबर रोजी होणार आहे. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांच्या या कार्यपद्धतीवर ॲड, साखरे यांनी संशय व्यक्त करत ते पक्षपातीपणा करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.




