ब्रेकिंगमहाराष्ट्र
ढोकी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; तेर येथे गांजा विक्रेत्याला बेड्या, ८० हजारांचा मुद्देमाल जप्त
ढोकी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; तेर येथे गांजा विक्रेत्याला बेड्या, ८० हजारांचा मुद्देमाल जप्त

0
7
6
4
8
6
ढोकी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; तेर येथे गांजा विक्रेत्याला बेड्या, ८० हजारांचा मुद्देमाल जप्त
धाराशिव : जिल्ह्यात वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यावर ढोकी पोलिसांनी मोठी कारवाई करत तेर येथील गांजा विक्रेत्याला रंगेहाथ अटक केली आहे. पोलिसांनी छापा टाकून तब्बल ८० हजार रुपयांचा गांजा जप्त केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.ढोकी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विलास हजारे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, तेर येथील अच्युत प्रभु पवार हा गांजाची चोरटी विक्री करत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने पथक तयार करून आरोपीच्या घरावर अचानक छापा टाकला.छाप्यात आरोपी अच्युत प्रभु पवार (वय ४५, रा. तेर) याच्या घरातून हिरव्या रंगाचा उग्र वास येणारा सुमारे १६०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त अमली पदार्थाची किंमत सुमारे ८० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.ढोकी पोलिसांच्या या कारवाईमुळे अमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.
0
7
6
4
8
6



