ब्रेकिंगमहाराष्ट्र
बारालिंग सांप्रदायिक भजनी मंडळाची माघवारी पायी दिंडी तुळजापूरहून पंढरपूरकडे प्रस्थान
गेल्या वर्षी सोलापूर जिल्हाधिकारी यांनी स्वतः उपस्थित राहून दिंडीचे कौतुक केले होते.

0
7
6
4
9
7
बारालिंग सांप्रदायिक भजनी मंडळाची माघवारी पायी दिंडी तुळजापूरहून पंढरपूरकडे प्रस्थान

गेल्या वर्षी सोलापूर जिल्हाधिकारी यांनी स्वतः उपस्थित राहून दिंडीचे कौतुक केले होते.
तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी
तीर्थक्षेत्र तुळजापूर येथून निघणारी दिंडी गेली १७ वर्षे अखंड परंपरा जपणारी बारालिंग सांप्रदायिक भजनी मंडळ, तुळजापूर यांची माघवारी पायी दिंडी यंदाही मोठ्या भक्तिभावात शनिवार, दि. २४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजता मध्यवर्ती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, वेताळनगर (तुळजापूर) येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाली.या दिंडी सोहळ्याचे मार्गदर्शन ह.भ.प.आदरणीय भागवत महाराज चौरे (आजरेकर फड,पंढरपूर) यांचे लाभले असून,चोपदार -ह.भ.प. महादेव महाराज पौळ,ह.भ.प. विशाल इंगळे महाराज व विणेकरी – ह.भ.प.आनंद महाराज सावंत (सर) यांचे नेतृत्व लाभले आहे.

२४ ते ३० जानेवारीदरम्यान पायी वारी दि. २४ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत ही दिंडी तुळजापूर ते पंढरपूर असा प्रवास करणार आहे. पंढरपूर येथे संत विहार, ६५ एकर परिसर (प्लॉट क्र. ५०, ५१, ५२, ५३, ३७, ३८, ३९, ४०) येथे दिंडीचा मुक्काम राहणार आहे.

पंचक्रोषीतून मोठ्या संख्येने भाविक सहभागी यावर्षी तुळजापूरसह आळजापूर, मिर्जनपूर, शिराढोण, अमृतवाडी, ढेकरी, पिंपळाखुर्द, मोर्डा, तीर्थ खुर्द, कात्री, काटी, आपसिंगा, वरवंटी, कापसी, रायखेल, सारोळा, चिंचोली आदी पंचक्रोषीतील गावांमधून मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरकडे दाखल होणार आहेत.आरोग्य व शिस्तीचे काटेकोर पालन आवश्यक वारीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे, आवश्यक औषधे सोबत ठेवणे बंधनकारक आहे.लहान मुले वारीला सोबत आणू नयेत, तसेच धूम्रपान व मद्यपानास सक्त मनाई असून नियमभंग करणाऱ्यांना दिंडीमधून वगळण्यात येईल, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक
मागील वर्षी (२०२५) तुळजापूरच्या दिंडीचे वैशिष्ट्य पाहण्यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी स्वतः उपस्थित राहिले होते आणि उत्कृष्ट नियोजन व शिस्तबद्ध वारीबद्दल तुळजापूर दिंडीला प्रथम क्रमांक मिळाला होता.देणगीदार व अन्नदात्यांचे आयोजकांकडून आवाहन दिंडी यशस्वीतेसाठी देणगीदार, हितचिंतक व अन्नदात्यांनी सहकार्य करावे व देणगीची रितसर पावती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.या भक्तिमय सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सौ. व श्री आनंद सावंत (विणेकरी), सुरेश डेरके, महादेव पोळ, दत्ता हंगरगेकर, प्रभाकर नाईकवाडे, सर्जेराव निकम, ओंकार हरणमारे, अविनाश पवार तसेच समस्त बारालिंग सांप्रदायिक भजनी मंडळ, तुळजापूर परिश्रम घेत आहेत.सादर : जय हरी विठ्ठल!

0
7
6
4
9
7



