Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

ढोकी परिसरातील ॲल्युमिनियम तार चोर पोलिसांच्या ताब्यात! स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई !

ढोकी परिसरातील ॲल्युमिनियम तार चोर पोलिसांच्या ताब्यात! स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई !

0 7 6 4 8 6

ढोकी परिसरातील ॲल्युमिनियम तार चोर पोलिसांच्या ताब्यात! स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई !

धाराशिव : प्रतिनिधी
अल्युमिनियम तारांची चोरी करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे अटक करत मोठा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सपोनि सुदर्शन कासार यांच्या पथकाने पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार संशयित अब्दुल जोहर शेख (रा. कळंब, जि. धाराशिव) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने ढोकी हद्दीतील गोवर्धनवाडी परिसरात साथीदारांच्या मदतीने ॲल्युमिनियम तार चोरी केली असल्याची कबुली दिली.
तपासात पोलिसांना कळाले की या घटनेचा गुन्हा पोलीस ठाणे ढोकी येथे नोंद आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा पिकअप गाडी तसेच सुमारे पाच किलोमीटर ॲल्युमिनियम तार असा एकूण १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ताब्यात असलेल्या आरोपीने आपल्या अन्य साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाईसाठी पोलीस ठाणे ढोकी येथे हजर केले आहे.

 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोहेका शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, रत्नदीप डोंगरे व नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली.स्थानिक गुन्हे शाखेची ही कारवाई चर्चेचा विषय ठरली असून जिल्ह्यातील तारेचोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे