Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूरचा गौरव— शिवतेज भोसले यांना राज्यशास्त्रात पीएच.डी.

तुळजापूरचा गौरव— शिवतेज भोसले यांना राज्यशास्त्रात पीएच.डी.

0 7 6 5 0 5

तुळजापूरचा गौरव— शिवतेज भोसले यांना राज्यशास्त्रात पीएच.डी.

तुळजापूर | प्रतिनिधी

तुळजापूरच्या शैक्षणिक भूमीला अभिमानास्पद ठरणारी घटना घडली आहे. येथील रहिवासी शिवतेज संभाजीराव भोसले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या तर्फे राज्यशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. “मानवतावादाची संकल्पना आणि मानवेंद्रनाथ रॉय यांचा नवमानवतावाद” या विषयावर त्यांनी आपला संशोधन प्रबंध सादर केला असून, त्यांच्या संशोधनाला विद्यापीठाने उच्च दर्जाची दाद दिली आहे.

या प्रबंधासाठी मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. निलेश शेरे (आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेज, नळदुर्ग) यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. संशोधनप्रक्रियेमध्ये भोसले यांनी दाखविलेली चिकाटी, विचारसंपन्नता आणि शास्त्रीय दृष्टी यांचे शैक्षणिक वर्तुळात विशेष कौतुक होत आहे.

भोसले यांच्या या यशाबद्दल माजी मंत्री व बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय मधुकरराव चव्हाण, सचिव उल्हास (दादा) बोरगावकर, माजी व्यवस्थापन सदस्य प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, प्रा. डॉ. महेश मोटे (राज्यशास्त्र विभाग प्रमुख, माधवराव पाटील महाविद्यालय, मुरूम), प्राचार्य डॉ. मुकुंद गायकवाड, उपप्राचार्य डॉ. प्रविण भाले, विठ्ठलराव गडदे, प्रा. डॉ. अंबादास बिराजदार, प्रा. डॉ. श्रीरंग लोखंडे, प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

तुळजापूरातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरतील असे यश मिळवून शिवतेज भोसले यांनी ज्ञानार्जन आणि संशोधनाच्या क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

2/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे