Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी कळली आणि मनाला अतिशय दुःख झाले – माजी मंत्री मधुकरराव चव्हाण

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी कळली आणि मनाला अतिशय दुःख झाले - माजी मंत्री मधुकरराव चव्हाण

0 7 6 4 8 7

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी कळली आणि मनाला अतिशय दुःख झाले – माजी मंत्री मधुकरराव चव्हाण

तुळजापूर : प्रतिनिधी

अजितदादा यांच्या विमान अपघाताची बातमी समजली आणि मनअतिशय सुन्न झाले. महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुजन समाजातील एक जनसामान्याचा नेता यांचे अपघाती निधन झाल्याने
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. अजित दादा पवार यांच्या सहकार्याने मला राज्य सहकारी बँकेवर अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशनच्या चेअरमन पदावर काम करण्याची संधी त्यांच्या सहकार्याने मिळाली मी वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष असताना संभाजीनगर येथे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी पूर्वी त्यांनी आमच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्या आणि कै. विलासराव देशमुख यांच्या साथीने कृष्णा खोऱ्यातील 23 टीएमसी पाणी मराठवाड्याला मंजूर केले. राज्य मंत्रिमंडळामध्ये मी मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी मला खूप मोलाची साथ दिली. त्यांनी पाटबंधारे, ऊर्जा, वित्त व नियोजन यासारखी खाती समर्थपणे सांभाळली. कार्यकर्त्याच्या हाकेला ओ देणारा एक तळमळीचा नेता अशी त्यांची ओळख होती. अतिशय हुशार, अभ्यासू, कणखर व परखड नेता महाराष्ट्राने गमावला आहे, याचे मला अतिव दुःख आहे. मी त्याना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे