ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
मूकबधीर तरुणास अमानुष मारहाण ;जगदाळे कॉम्प्लेक्स परिसरात खळबळ तुळजापूर खुर्द येथील पाच जणांवर गंभीर आरोप, पोलिसांत तक्रार दाखल !

0
6
7
8
4
1
मूकबधीर तरुणास अमानुष मारहाण ;जगदाळे कॉम्प्लेक्स परिसरात खळबळ तुळजापूर खुर्द येथील पाच जणांवर गंभीर आरोप, पोलिसांत तक्रार दाखल !
तुळजापूर | प्रतिनिधी
शहरातील जगदाळे कॉम्प्लेक्स परिसरात मूकबधीर तरुणास बांधून काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २२) सायंकाळी घडली. तु आमच्या भागात का आलास असे म्हणत पाच जणांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला असून,या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.या घटनेत राजेश श्रीमंत पवार (वय ३२, रा. घाटशिळ रोड, पाण्याच्या टाकीजवळ, तुळजापूर) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. तो लहानपणापासून मूकबधीर असून, घटनेनंतर त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.फिर्यादी कांताबाई अभिमान चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.२२ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास राजेश यास मारहाण होत असल्याची माहिती फोनवरून मिळाल्यानंतर त्या कुटुंबीयांसह घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तेथे राजेशचे दोन्ही हात बांधून डोक्यावर, तोंडावर, बरगड्यांवर व गुप्तांगावर काठीने तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण सुरू असल्याचे दिसून आले.
मारहाण थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केली व पुन्हा आमच्या भागात दिसला तर जिवे मारू अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी
1) सुरज हरिश्चंद्र जगदाळे
2) प्रतिक जगदाळे
3) गणेश जगदाळे
4) राजाभाऊ देशमाने
5) शंतनू नरवडे
(सर्व रा. तुळजापूर खुर्द)
यांच्यासह इतरांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत.घटनेनंतर जखमी राजेश पवार यास तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मा प्रकरणाची नोंद तुळजापूर पोलीस ठाण्यात झाली आहे. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
0
6
7
8
4
1



