Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

पंचायत समिती 6 मार्च तर जिल्हा परिषद पदाधिकारी निवड 13 मार्चला

पंचायत समिती 6 मार्च तर जिल्हा परिषद पदाधिकारी निवड 13 मार्चला

0 6 7 8 4 1

तुळजापूर : जिल्ह्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, येत्या दि.६ व १३ मार्च रोजी ही प्रक्रिया पार पडणार आहे.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. दि.६ मार्च रोजी जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये सभापती व उपसभापती पदांसाठी निवड होणार आहे. तर दि १३ मार्च रोजी धाराशिव जिल्हा परिषद येथे सर्वसाधारण महिला अध्यक्ष पदासह उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. संपूर्ण निवड प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पिठासन अधिकारी म्हणून पार पडणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.दरम्यान, जिल्हा परिषद सदस्यांनी अलीकडेच कर्नाटक, कोकण व गोवा दौरे केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारतीय जनता पार्टीकडून तेर येथील जिल्हा परिषद उमेदवार तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सौभाग्यवती अर्चनाताई पाटील यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी जोरदार चर्चा रंगली आहे. पक्षांतर्गत हालचालींना वेग आला असून, अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.निवड प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून,६ आणि १३ मार्च हे दिवस राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे ठरणार आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे