ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
तुळजापूर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग १० मध्ये १९०० मतदाना पैकी ५०% हून अधिक महिला मतदार आनंद जगताप व सौ.धरती चिनमय मगर हे उमेदवार मैदानात “बहिणी”ठरणार किंगमेकर!
आनंद जगताप व सौ.धरती चिनमय मगर हे उमेदवाराच्या विजयासाठी ठरणार "बहिणी" किंगमेकर!
0
6
7
8
4
1
तुळजापूर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग १० मध्ये १९०० पैकी ५०% हून अधिक महिला मतदार !

आनंद जगताप व सौ.धरती चिनमय मगर हे उमेदवाराच्या विजयासाठी “बहिणी”ठरणार किंगमेकर!
तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी
नगरपरिषद निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असताना प्रभाग क्रमांक १० मध्ये ‘लाडक्या बहिणींचा’ निर्णायक प्रभाव स्पष्टपणे जाणवू लागला आहे. एकूण १९०० मतदारांपैकी अर्ध्याहून अधिक महिला मतदार, म्हणजेच या प्रभागात यंदाची लढत बहिणींच्या मतांवरच ठरणार, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.

सावरकर चौक, नळदुर्ग रोड, गोपाळ नगर, पूर्व मंगळवार पेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक -या भागांत महिलांच्या अडचणींना केंद्रस्थानी धरूनच प्रचाराचे समीकरण फिरत आहे.

महाविकास आघाडीकडून आनंद जगताप व सौ.धरती चिनमय मगर हे उमेदवार मैदानात असून, दोघांचाही भर ‘बहिणींच्या प्रश्नांवर’ आहे. पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, घरगुती सुविधा, तुटलेले रस्ते, नाले – या दैनंदिन मुद्द्यांवर महिलांची पकड ठाम असल्याने, त्यांचे समाधान हीच उमेदवारांसाठी जिंकण्याची किल्ली ठरणार आहे.

प्रभाग १० मधील लढतीचा कल सध्या स्पष्ट नसला, तरी एक गोष्ट निश्चित – यंदा तुळजापूरमध्ये बहिणी ठरणार खऱ्या अर्थाने ‘किंगमेकर’!
0
6
7
8
4
1



