Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

पत्रकारितेत विक्रम नाईकनवरे यांना प्रथम श्रेणीची पदवी

पत्रकारितेत विक्रम नाईकनवरे यांना प्रथम श्रेणीची पदवी

0 7 6 4 8 6

पत्रकारितेत विक्रम नाईकनवरे यांना प्रथम श्रेणीची पदवी

पुणे/पंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूर येथील विक्रम राजाराम नाईकनवरे यांनी पत्रकारिता विषयात पदवी संपादन करून यशाला गवसणी घातली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ३१ व्या दीक्षांत समारंभात त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली असून त्यांनी प्रथम श्रेणीत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, शिक्षणाचे माध्यम मराठी ठेवत त्यांनी माध्यम व पत्रकारिता क्षेत्रातील मेहनत, सातत्य आणि गुणवत्तेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.या दीक्षांत समारंभात सुमारे १ लाख २४ हजार विद्यार्थ्यांना विविध पदव्या प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. निर्मलजीतसिंह कलसी उपस्थित होते. तसेच विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनावणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली.
विक्रम नाईकनवरे यांच्या या यशाबद्दल त्यांचे मित्रपरिवार, शिक्षकवृंद आणि नातेवाईकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला असून, त्यांच्या पुढील पत्रकारितेतील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे