Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

कळंब न्यायालयाचा मोठा निकाल : गांजा तस्करी प्रकरणातील आरोपी निर्दोष मुक्त

कळंब न्यायालयाचा मोठा निकाल : गांजा तस्करी प्रकरणातील आरोपी निर्दोष मुक्त

0 7 6 4 9 7

कळंब न्यायालयाचा मोठा निकाल : गांजा तस्करी प्रकरणातील आरोपी निर्दोष मुक्त

धाराशिव : गांजा तस्करी प्रकरणातील गंभीर आरोपांमध्ये अडकलेल्या आरोपीची विशेष कळंब जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या निर्णयामुळे प्रकरणाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे.प्रकरण क्रमांक स्पेशल केस नं. 30/2024 NDPS 8(c), 20(b), 20 अंतर्गत (सरकार विरुद्ध सौरभ व इतर) आरोप ठेवण्यात आले होते. सदर प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच कळंब पोलीस स्टेशन यांच्या मार्फत गांजा तस्करी करत असलेले आरोपी पकडून रेड करण्यात आली होती. या कारवाईत सुमारे 28 ते 30 किलो गांजा जप्त करण्यात आला होता.
या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी प्रभावी युक्तिवाद सादर करत सरकार पक्षाच्या साक्षीदारांचा कसून उलटतपास केला. उलटतपासादरम्यान आरोपीने कोणताही गुन्हा केला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच NDPS कायद्यांतर्गत पंचनाम्याच्या वेळी तसेच पंचनामा प्रक्रियेदरम्यान कायद्याच्या तरतुदींचे पालन करण्यात आले नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.याचप्रमाणे आरोपीची अंगझडती घेताना देखील कायदेशीर प्रक्रियेचे पालन झाले नसल्याची बाबही मांडण्यात आली. सरकार पक्ष आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचा ठोस युक्तिवाद ॲड. साखरे यांनी केला. तसेच सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे विविध निर्णय सादर करून आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होत नसल्याची बाजू भक्कमपणे मांडली.दोन्ही बाजूंचे युक्तिवाद व सादर पुरावे विचारात घेऊन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, कळंब, श्री राजे भोसले यांनी सबळ पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.या प्रकरणात ॲड. विशाल साखरे यांना ॲड. अमित गोळे, ॲड. मंजुषा साखरे, ॲड. महेश लोहार, ॲड. शुभम तांबे, ॲड. संकेत गोरे, ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी, ॲड. अर्चना कांबळे, ॲड. ओंकार कोरेगावकर, ॲड. रोहित लोमटे, पृथ्वीराज खोचरे व महेश पवार यांनी सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे